पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी परिसरात आश्रय घेतलाअसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग भागात असलेल्या अहलान गागरमांडूमध्ये शोध मोहीम सुरू केली. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यात आला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही गोळीबार केला.याआधी ६ ऑगस्ट रोजी बसंतगढ परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.