

कोलकाता; वृत्तसंस्था : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एआयए) मानवी तस्करीप्रकरणी मोठी कारवाई करत कोलकात्यासह पश्चिम बंगालमधील पाच ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईदरम्यान, दोन जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे.
या दोन्ही आरोपींची ओळख आमिर अली शेख आणि अमल कृष्ण मंडल अशी पटली आहे. त्यांना पश्चिम बंगालच्या 24 परगणा जिल्ह्यातून अटक केली आहे. एनआयएच्या माहितीनुसार, एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची भारतात बेकायदेशीरपणे तस्करी केली होती. आरोपींनी तिला नोकरीचे आमिष दाखवून तिचे शोषण करण्यास भाग पाडले होते.