Trinamool Congress | तृणमूलमधील बंडखोर गटाचे एनसीपीआयमध्ये विलीनीकरण : काकोली घोष पक्षाच्या अध्यक्षा

केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली माहिती
बंडखोर गटाने नुकतीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती
बंडखोर गटाने नुकतीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली होती File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील बंडखोर खासदारांचा गट नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केले आहे. तसेच ३१ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत काकोली घोष दास्तीदार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, अशी माहिती तृणमूलच्या बंडखोर गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली.  

तृणमूल काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकवण्यात आला तेव्हापासून अनेक गोष्टींची चर्चा सुरू होती. यामध्ये बंडखोर खासदारांचा गट कोणत्या पक्षात विलीन होणार, सोबतच संबंधित पक्षाचे नेतृत्व कोण करणार अशा गोष्टी सुरू होत्या. यावर आता स्पष्टता आली असून काकोली घोष दास्तीदार यांच्या नेतृत्वात नॅशनलिस्ट सिटीजन पार्टी ऑफ इंडिया काम करणार आहे. हा पक्ष आणि खासदार एनडीएमध्ये अधिकृतरित्या सहभागी झाल्यानंतर केंद्र सरकारमध्ये या पक्षाला वाटा देखील मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यानंतर भाजप प्रणित इंडियाला आणखी एक नवा भिडू मिळणार आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news