कोलकाता: पुढारी ऑनलाईन; गेल्या काही दिवसापासून लिव्ह इन रिलेशनशिप, लग्न, प्रेग्नेंसी यांसारख्या गोष्टीमुळे चर्चेत असलणाऱ्या टीएसी खासदार नुसरत जहाँ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. निखिल जैन यांच्यासोबत झालेलं लग्न हे लग्न नव्हतं तर ते लिव्ह इन रिलेशनशिप होती. नुसरत यांच्या या दाव्यामुळे त्यांच्या प्रेग्नेंसीच्या चर्चेला उत आला. दरम्यान, नुसरत यांचा बेबी बंप असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुसरत जहाँ यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत त त्या सहा महिन्यांच्या गरोदर असल्याचे सांगितले जात आहे. याच फोटोत बंगाली अभिनेत्री सरबंती चटर्जी आणि इतर दोन मैत्रिणींसोबत नुसरत जहाँ दिसत आहे.
गेल्या दोन आठवड्यापसून नुसरत यांच्या प्रेग्नेंसीची चर्चा देशभर रंगली आहे. त्या ६ महिन्याचा प्रेग्नेंट आहेत असे वृत्त एका बंगाली वृत्तपत्रीकेतून जाहिर झाले. मात्र, त्यांचे पती निखिल जैन यांनी ते बाळ माझे नसल्याचे म्हटले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. यासर्वांत आश्चर्यकारक बाब म्हणजे नुसरत यांनी जैन यांच्यासोबत झालेलं लग्न हे लग्न नव्हते तर ते लिव्ह इन रिलेशनशिप होत असा दावा केला.
लिव्ह इन रिलेशनशिप की लग्न
निखिल जैन यांच्यासोबत झालेलं लग्न हे लग्न नव्हतं तर ते लिव्ह इन रिलेशनशिप होती असा दावा नुसरत जहाँ यांनी केला आहे. लग्न तुर्कित केलेलं होतं आणि तिथल्या कायद्यानुसार ते अवैध असल्याचा दावा नुसरत जहाँ यांचा आहे. निखिल जैन यांच्यावर गंभीर आरोप करत नातं संपवल्याची घोषणाही नुसरत त्यांनी केली आहे.
अफेअरची चर्चा
पती निखिल जैन यांनी आपण त्या बाळाचे बाप नसल्याचं जाहीर करुन टाकले. निखिल जैन नाही तर मग कोण? असा सवाल चर्चेत असतानाच नुसरत जहाँ यांचे अभिनेता यश दासगुप्ता यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या.