

पुढारी ऑनलाईन डेस्क ः तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. टोकण घेण्यासाठी एकाच ठिकाणी ४ हजार भाविक जमले होते. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली. तसेच या घटनेत २५ जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तिरुपतीमधील विष्णू निवास आणि रामनायडू शाळेजवळ ही घटना घडली ज्यात गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे.