Tirupati Balaji | तिरुमला मंदिरात विक्रमी 12 लाख भाविकांनी केले केस अर्पण : काय आहे प्रथा, ‘कल्याण कट्टा’ केलेल्या केसांचे पुढे काय होते?

1 ते 27 मे दरम्यान केस अपर्ण, केस विक्रीतून देवस्थानला दरवर्षी 200 कोटींचे उत्‍पन्न
Tirupati Balaji
Tirupati Balaji | तिरुमला मंदिरात विक्रमी 12 लाख भाविकांनी केले केस अर्पण
Published on
Updated on

Tirupati Balaji भारतातील नाहीतर जगातील एक श्रीमंत देवस्थान असलेल्या आंध्रपद्रशेमधील तिरूमला मंदिरात मे महिन्यात भगवान व्यकंटेश्वराच्या चरणी केस अर्पण करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. या मे महिन्यात 12.43 भाविकांनी मुंडण करुन बालाजीला केसांचे दान केले आहे. हा एका महिन्यात सर्वाधिक केस दान करण्याचा नवीन विक्रम आहे. हे केस दान केवळ 1 ते 27 मे दरम्यान झाले आहे. या परंपरेला धार्मिक भाषेत 'कल्याण कट्टा' (Kalyan Katta) असे म्हटले जाते.

Tirumala Tirupati Devasthanam तिरुमला तिरुपती देवस्थान टीटीडी (TTD) ने दिलेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे ही केस दान करण्याची ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. या केसांना ‘काळे सोने’ म्हटले जाते. याठिकाणी येणारा भाविक महिला किंवा पुरुष स्वच्छेने केस दान करत असतो. यंदा मे महिन्यात सर्वाधिक भाविकांनी केस अर्पण केले

केस दान करण्याची काय आहे प्रथा

तिरुपती बालाजी मंदिरातील केशदानाच्या प्रथेबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत, परंतु वैष्णव धर्मग्रंथांनुसार, भगवान विष्णूंना लक्ष्मी, भूदेवी आणि नीला देवी या तीन पत्नी आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील नीलाद्री पर्वतरांगा नीला देवीला समर्पित आहेत. पौराणिक कथेनुसार, नीलादेवी या भगवान व्यंकटेश्वराला आपले केस अर्पण करणाऱ्या पहिल्या भक्त होत्या. भगवान श्रीनिवासांनी या पर्वताला त्यांचे नाव दिले, नीलाद्री.

नीला देवींचा त्याग

एकदा भगवान बालाजी यांच्या डोक्यावर दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्यांच्या डोक्यावरील काही केस गळून पडले. हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या गंधर्व राजकुमारी 'नीला देवी' यांना खूप वाईट वाटले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचे सुंदर केस कापले आणि ते भगवान बालाजी यांच्या डोक्यावरील जखमेवर लावले.

भगवान बालाजींचा आशीर्वाद

नीला देवींच्या या अपूर्व त्यागामुळे भगवान बालाजींची जखम त्वरित बरी झाली. देवीचा हा त्याग पाहून भगवान बालाजी अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की, जो कोणी माझ्या चरणी येऊन आपल्या केसांचा त्याग करेल, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि त्याला मिळणाऱ्या पुण्याचा एक भाग नीला देवींनाही मिळेल.

केसांचे काय केले जाते

भाविकांनी अर्पण केलेले केस मंदिरातून गोदामात आणले जातात. तिथे केसांच्या लांबीनुसार त्यांचे ५ ते ६ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाते. लांब आणि चांगल्या दर्जाच्या केसांची किंमत जास्त असते. वर्गीकरण केल्यानंतर हे केस व्यवस्थित धुऊन, स्वच्छ केले जातात. त्यानंतर त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते जंतूमुक्त केले जातात आणि योग्य तापमानात सुकवले जातात. तिरुमला देवस्थान टीटीडी (TTD) द्वारे दरमहा किंवा ठराविक काळाने या केसांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ई-लिलाव' केला जातो. जगभरातील मोठे व्यापारी यात सहभागी होतात.

या केसांच्या लिलावातून तिरुपती देवस्थानला दरवर्षी अंदाजे १५० ते २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळतो. हे केस प्रामुख्याने अमेरिका, युरोप, चीन आणि आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केले जातात. तिथे या केसांचा वापर उच्च दर्जाचे विग आणि हेअर एक्सटेंशन्स बनवण्यासाठी केला जातो. भारतीय केस हे नैसर्गिकरित्या मजबूत आणि न रसायने लावलेले असल्याने जागतिक बाजारात त्यांना मोठी मागणी असते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news