Tirupati Trust Corruption Case | तिरुपती ट्रस्‍ट अधिकार्‍याची पाच कोटींची माया जप्‍त

एसीबीचे सात ठिकाणी छापे; रोकडसह सोने-चांदी हस्‍तगत
Tirupati Trust Corruption Case |
Tirupati Trust Corruption Case | तिरुपती ट्रस्‍ट अधिकार्‍याची पाच कोटींची माया जप्‍त
Published on
Updated on

तिरुपती; वृत्तसंस्‍था : अयोध्‍येतील श्रीराम मंदिर ट्रस्‍ट देणगी चोरी प्रकरणापाठोपाठ आता भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजीच्या मंदिर ट्रस्‍टच्‍या अधिकार्‍याकडून पाच कोटींची माया जप्‍त करण्‍यात आल्‍याने खळबळ उडाली. आंध्र प्रदेशच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. मेंडू लोकनाधम असे या अधिकार्‍याचे नाव असून, तो तिरुमला तिरुपती देवस्‍थानचा (टीटीडी) उपकार्यकारी अधिकारी आहे. लोकनाधमविरोधात उत्पन्‍नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्याचा गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

तिरुपती लाडू भेसळ प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) टीटीडीच्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेशी संबंधित माहिती एसीबीला दिली होती. त्‍याआधारे एसीबीचे डीएसपी श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखाली एसीबीच्या सात पथकांनी लोकनाधमशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले.

नेल्लूर एसीबी न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटनुसार हे छापे टाकले गेल्‍याचे समजते. लोकनाधम याच्‍याकडे ज्ञात उत्पन्न स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या आरोपांच्या तपासाचा हा भाग आहे. मालमत्तेचे प्रमाण व त्यांचे स्त्रोत निश्चितीसाठी एसीबी अधिकारी मालमत्तेची कागदपत्रे, सोने, आर्थिक नोंदी आणि इतर मौल्यवान वस्तूंची तपासणी करत आहेत.

ही सापडली मालमत्ता

* लोकनाधम याच्या पत्नीच्या नावे घर.

* दोन प्लॉटसह एक इमारत.

* वडमालापेटा मंडळाच्‍या पाडिरेडू

* आरण्यम गावात प्लॉट.

* मुलाच्या नावावरील श्रीनिवास नगरमधील प्लॉटची कागदपत्रे.

* लोकनाधम व त्याच्या मुलाच्या नावे चार मुदत ठेवी.

* मेहुण्यांच्या घरी ३१.९८ लाख मूल्याच्‍या मालमत्तेची कागदपत्रे

* दोन किलो सोने.

* १२.५ लाखांची रोकड, ६.५ किलो चांदी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news