वाघीण चुकून गावात शिरली आणि जीव गमावून बसली !

Tigress Killed People In UP : उत्तरप्रदेशमध्ये दुधवा टायगर रिजर्वजवळ घडली घटना
Tiger Killed People
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तरप्रदेशातील लखमीपूर खीरी येथील दुधवा टायगर रिजर्वमध्ये एक वाघीण अभयारण्यातून चूकून लगतच्या गावात शिरली. या वाघीणीने दोन गावकऱ्यांवर हल्‍ला केला. यामुळे चिडलेल्‍या गावकऱ्यांनी या वाघीणीला काठीणे मारहाण करुन मारुन टाकले. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की दुधवा अभयारण्याच्या बाजूलाच असलेल्‍या फुलवारीया नावाचे गावात ही २ वर्षे वयाची वाघीण शिरली होती. दुधवा बफर झोनचे अधिकारी सौरिश सहाय यांनी सांगितले की पलिया तहसील मंडळातील फूलवारीया गावातून या वाघीणीचे शव ताब्‍यात घेतले असून, वन्य जीव कायद्यातंर्गत पोलिस स्‍टेशनमध्ये अज्ञात व्यक्‍तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्‍यान हल्‍ला केलेल्‍या दोन गावकऱ्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असून त्‍यांची प्रकृती स्‍थिर आहे. तसेच मृत वाघिंणीचे शवविश्चेदन राष्‍ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या निर्देशानूसार करण्यात आले. वाघीणीचा विसेरा बरेली येथील भारतीय वन्यजीव संस्‍थेमध्ये अधिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे.

नरभक्षक वाघांचा हल्‍ला होण्याच्या घटना समोर येत आहेत. केरळमधील वायनाड जिल्‍ह्यात एक नरभक्षक वाघ मृतावस्‍थेत आढळला. यावेळी आजूबाजूच्या गावातील लोकांनी आनंद व्यक्‍त करत मिठाई वाटली होती. या वाघाने सोमवारी कॉफीच्या बागेत काम करणाऱ्या महिलेवर हल्‍ला करुन ठार केले होते. यामुळे या घटनेविरोधात आंदोलन करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news