छत्तीसगडमध्‍ये चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार

नारायपूर जिल्‍ह्यात सुरक्षा दलांची कारवाई
Encounter in Chhattisgarh
Representative image
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्‍याची माहिती पोलिसांनी दिली. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. ( Encounter in Chhattisgarh )

छत्तीसगडमधील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील माड भागात नक्षलवाद्‍यांनी आश्रय घेतला असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार डीआरजी, एसटीएफ आणि बीएसएफच्या पथकांनी शोधमोहीम सुरू केली. आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलींमध्ये चकमक झाली, या चकमकीत तीन महिला नक्षलवादी ठार झाल्‍या.अशी माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली.

छत्तीसगडमध्‍ये यावर्षी आतापर्यंत १३८ नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलग्रस्‍त सात जिल्ह्यांपैकी बस्तर विभागात १३६ नक्षलवादी ठार झाले आहेत. धमतरी जिल्ह्यात दोन जण चकमकीत मारले गेले आहेत.

15 जून रोजी नारायणपूर, कांकेर, दंतेवाडा आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांतील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी केलेल्‍या संयुक्त कारवाईत आठ नक्षलवादी ठार झाले होते. यापूर्वी 30 एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन महिलांसह दहा नक्षलवादी ठार झाले होते.16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी ठार झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news