PM Modi Param Rudra supercomputers
पंतप्रधान नरेंद्र मोदीFile Photo

स्वदेशी बनावटीचे तीन परम महासंगणक देशसेवेत रूजू

‘परम रुद्र’चे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
Published on

नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 130 कोटी रुपयांच्या स्वदेशी बनावटीच्या तीन ‘परम रुद्र’ महासंगणकांचे लोकार्पण केले. हे महासंगणक पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे ठेवण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महासंगणकीय प्रणालीअंतर्गत वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. हे तिन्ही महासंगणक स्वदेशी तंत्रज्ञानावर विकसित करण्यात आले आहेत. अनेक वैज्ञानिक विषयांमध्ये अत्याधुनिक संशोधनासाठी या संगणकांचा वापर होणार आहे. दूरद़ृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमाला संबोधित केले. ते म्हणाले की, ‘परम रुद्र’ महासंगणक, भारत संगणकीय क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. संगणकीय क्रांतीत आपल्या देशाचे योगदान बिट, बाईटस्मध्ये नसून टेराबाईटस् आणि पेटाबाईटस्मध्ये असले पाहिजे. त्यामुळे आपण योग्य दिशेने, योग्य गतीने वाटचाल करत आहोत, हे या यशामुळे सिद्ध होते.

प्रत्युष: भारताचा सर्वात वेगवान महासंगणक | पुढारी

यंदाच्या अर्थसंकल्पात संशोधन निधीसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारताने वैज्ञानिक शोधात जागतिकस्तरावर आघाडी घेतली पाहिजे. अंतराळ क्षेत्र हे याचे प्रमुख उदाहरण आहे, जिथे भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला असल्याचे त्यांनी सांगितले. विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य आणि अवकाश संशोधन क्षेत्रासाठी या महासंगणकांचा उपयोग होणार आहे.

  • हवामान, पर्यावरणीय बदलासाठी वापर

  • कृषी, आपत्ती निवारणासाठी उपयुक्त

  • विज्ञानासह अभियांत्रिकीच्या विज्ञानास बळ

PM Modi Param Rudra supercomputers
हवामान खात्याला महासंगणक ; केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री किरण रिजिजू यांची माहिती
अर्थव्यवस्था, व्यवसाय सुलभता, आपत्ती निवारण आणि सुकर जीवनशैलीसाठी ‘परम रुद्र’ महासंगणक उपयुक्त ठरणार आहे. नजीकच्या काळात सेमीकंडक्टर इको-सिस्टीममध्ये भारत स्वयंपूर्ण होईल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news