ही माझी शेवटची पत्रकार परिषद : CEC राजीव कुमार यांची स्‍पष्‍टाेक्‍ती

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या घोषणेवेळी 'ईव्‍हीएम'वरील आरोपांनाही दिले उत्तर
CEC Rajeev Kumar
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार .File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ही माझी शेवटची पत्रकार परिषद आहे, असे स्‍पष्‍ट करत मुख्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ संपत असल्‍याचे संकेत आज (दि.७) राजीव कुमार ( CEC Rajeev Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. आपल्या शेवटच्या पत्रकार परिषदेत त्‍यांनी आयुक्तांनी ईव्हीएम आणि अतिरिक्त मतांबाबत निवडणूक आयोगांवरील आरोपांना उत्तर दिले.

ईव्हीएमची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक

पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, "पोलिंग एजंटसमोर ईव्हीएम सील केले जातात. एजंटसमोर ईव्हीएममध्ये निवडणूक चिन्हे टाकली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया मतदानाच्‍या आधी सात ते आठ दिवस केली जाते. प्रत्येक पक्षाला याची माहिती दिली जाते. ईव्हीएमची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आहे. ईव्हीएममध्ये अवैध मतदान होण्याची शक्यता नाही."

'ईव्हीएम'मध्‍ये त्रुटी असल्‍याचा कोणताही पुरावा नाही

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, "ईव्हीएममध्ये विश्वासार्हतेचा किंवा कोणत्याही त्रुटीचा कोणताही पुरावा नाही. ईव्हीएममध्ये व्हायरस असणार्‍याचा प्रश्नच नाही. ईव्हीएममध्ये बेकायदेशीर मतांचा प्रश्नच नाही. कोणतीही हेराफेरी शक्य नाही. "उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय सतत तेच सांगत आहेत."

राजीव कुमार २५ वे मुख्‍य निवडणूक आयुक्‍त

राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्‍यांनी 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्‍हणून जबाबदारी स्वीकारली. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात 2020 मध्ये बिहारच्या राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मार्चमध्ये कोविड संसर्गादरम्यान आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुका, लोकसभा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडसह अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या.

कोण आहेत राजीव कुमार?

राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६०रोजी झाला. ते १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले आहे. केंद्रातील अनेक मंत्रालयांसह बिहार-झारखंड केडरमध्ये त्‍यांनी दीर्घकाळ काम केले. याशिवाय त्यांनी सामाजिक, पर्यावरण-वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही काम केले आहे. ते फेब्रुवारी 2020 मध्येच केंद्रीय वित्त सचिव पदावरून निवृत्त झाले होते.

निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा

राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत (जे आधी असेल ते) आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 मध्ये झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news