टॉप 100 एअरपोर्ट्समध्ये भारतातील 'या' चार विमानतळांचा समावेश; जाणून घ्या नंबर 1 वर कोण?

Skytrax Best Airports in world: टॉप 20 मध्ये एकाही भारतीय विमानतळाचा समावेश नाही
Skytrax Best Airports in world:
Skytrax Best Airports in world:pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील टॉप 100 विमानतळांमध्ये भारतातील केवळ चार विमानतळांचा समावेश झाला आहे. त्यातही राजधानी नवी दिल्लीतील विमानतळ टॉप 50 मध्ये आहे.

दरम्यान, जगातील टॉप 20 विमानतळांमध्ये एकाही भारतीय विमानतळाचा समावेश झालेला नसला, तरी यावेळी त्यांच्या क्रमांकात मात्र लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. Skytrax या आंतरराष्ट्रीय विमान प्रवास रेटिंग संस्थेने ही माहिती उघड केली आहे. (Skytrax Best Airports in world 2025)

तर Skytrax च्या माहितीनुसार राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत यंदा 32 व्या क्रमांकावर आहे. हे भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ असून तेथील आधुनिक टर्मिनल्स, कला प्रदर्शनं, कार्यक्षम इमिग्रेशन प्रक्रिया आणि चांगल्या कनेक्टिव्हिटीसाठी हे विमानतळ ओळखले जाते.

विशेष म्हणजे, सोशल मीडियावर दिल्ली विमानतळ ग्लोबल टॉप 5 मध्ये आहे तर आशियाई विमानतळांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

Airports  in Delhi, Mumbai, Bengaluru, Hyderabad
Airports in Delhi, Mumbai, Bengaluru, Hyderabad x

या यादीतील इतर भारतीय विमानतळे

  • इतर तीन भारतीय विमानतळांचाही समावेश टॉप 1000 मध्ये झाला आहे. बेंगळूरू येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत 48 व्या स्थानी आहे. निसर्गावर आधारित रचना, हिरवळ आणि कलाकुसर यांनी सजलेले येथील नवीन टर्मिनल 2 प्रसिद्ध आहे.

  • त्यानंतर हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत 56 व्या स्थानी आहे. स्वच्छता, कर्मचाऱ्यांचा प्रवाशांशी व्यवहार आणि सहज प्रवासी अनुभवासाठी हे एअरपोर्ट प्रसिद्ध आहे.

  • याशिवाय मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या यादीत 73 व्या स्थानी आहे. भव्य आर्किटेक्चर आणि कलात्मक मांडणीसाठी हे विमानतळ ओळखले जाते.

भारतीय विमानतळांच्या क्रमांकात प्रगती

दरम्यान, यंदा सर्व भारतीय विमानतळांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 2024 मध्ये 36 व्या स्थानी होते. ते यंदा 32 व्या क्रमांकावर आले आहे. बेंगळूरू येथील केम्पेगौडा विमानतळाने 58 व्या क्रमांकावरून 48 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी विमानतळ 59 व्या क्रमांकावरून 56 व्या स्थानी आले आहे. तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 95 व्या क्रमांकावरून 73 व्या क्रमांकावर आले आहे.

changi airport Singapore
changi airport Singaporex

सिंगापूरचे चांगी विमानतळ नंबर 1 वर

Skytrax ने सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टला 13 व्यांदा ‘जगातील सर्वोत्तम विमानतळ’ म्हणून निवडले आहे. लक्झरी, आराम आणि मनोरंजनासाठी ओळखले जाणारे चांगी हे विमानतळापेक्षा पर्यटनस्थळ जास्त वाटते. चांगी हे एक भव्य विमानतळ आहे.

चांगी येथे प्रवासी त्यांच्या फ्लाइटच्या 48 तास आधी चेक-इन करू शकतात. येथे एक भव्य ज्वेलरी मॉल, बाग, फुलपाखरांचे केंद्र आणि 40 मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा 'रेन व्हर्टेक्स' आहे. त्याशिवाय स्पा, हॉटेल्स, संग्रहालय, आर्ट गॅलरी, सिनेमा थिएटर, आणि अगदी डायनासोर थीम पार्क देखील आहे.

यंदाच्या Skytrax World Airport Awards मध्ये जगातील सर्वोत्तम डायनिंग, सर्वोत्तम वॉशरूम्स, आशियातील सर्वोत्तम विमानतळ हे ॲवॉर्ड चांगी विमानतळाने जिंकले आहेत.

CNN च्या माहितीनुसार, पुढील काही वर्षांमध्ये चांगी एअरपोर्ट २ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करणार असून येतील पाचवे टर्मिनल 2030 च्या दशकात सुरू होण्याची शक्यता आहे.

Skytrax ची 2025 मधील सर्वोत्तम विमानतळांची यादी

1. सिंगापूर चांगी विमानतळ (जगातील सर्वोत्तम, डायनिंग, वॉशरूम्स आणि आशियातील सर्वोत्तम म्हणून निवड)

2. दोहा हमाद (कतार) लक्झरी लाउंजेस, आर्टसाठी प्रसिद्ध

3. टोक्यो हानेडा

4. सोल इंचेओन

5. टोक्यो नारिता

6. हॉंगकॉंग आंतरराष्ट्रीय विमानतळ

7. पॅरिस चार्ल्स डी गॉल

8. रोम फिऊमिचिनो

9. म्युनिक

10. झ्युरिख

11. दुबई

12. हेलसिंकी-वांटा

13. व्हँकुव्हर (कॅनडा) – (अमेरिका खंडातील एकमेव टॉप २० मध्ये)

14. इस्तंबूल

15. व्हिएन्ना

16. मेलबर्न

17. नागोया सेंट्रायर (जपान)

18. कोपनहेगन

19. अ‍ॅमस्टरडॅम स्खिपोल

20. बहारिन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news