प्रयागराजमधील पाण्याची गुणवत्ता चांगलीच !

CM Yogi Aditynath | मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांचा दावा
CM Yogi Aditynath
मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ(Image source ANI )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

प्रयागराजमधील गंगा यमुना नद्मांमधील पाणी प्रदूषित असून. ते स्‍नानास योग्‍य नसल्‍याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण मंडळाने राष्‍ट्रीय हरीत लवादाकडे सादर केला आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु असून पाण्यात मिसळणाऱ्या मलमूत्रामुळे तेथील पाण्याचे प्रदूषण झाल्‍याचे अहवालात नमूद आहे.

या मुद्यावर आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी विधानसभेत उत्तर दिले. त्‍यांनी प्रयागराजमधील पाणी शुद्धच असल्‍याचा दावा त्‍यांनी केला आहे. त्‍यांनी म्‍हटले की प्रयागराजमध्ये ड्रेनेज सिस्‍टिम उत्तमरित्‍या काम करत असून सर्व ड्रेनेज पाईपलाईनमधील पाणी पूर्ण शुद्धीकरण करुनच नद्यांमध्ये सोडले जाते. उत्तरप्रदेश प्रदूषण महामंडळ दररोज पाण्याची गुणवत्ता तपासते. संगमाजवळील आजच्या पाण्याचा बीओडी (Biochemical Oxygen Demand) ३ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. तर ऑक्‍सिजनचे प्रमाण ८ ते ९ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. संगमावरील पाणी केवळ स्‍नानासाठीच नाही तर ‘आचमन‘ घेण्यासाठीही अगदी शुद्ध आहे असा दावा त्‍यांनी केला. त्‍याचबरोबर पाण्यातील मानवी मलमुत्रामुळे कॉलीफॉर्म वाढल्‍याचा दावाही त्‍यांनी फेटाळला. त्‍यांनी सांगितलेकी हे प्रमाण प्रति १०० एमएल पाण्यात २५०० एमपीएनपेक्षा कमीच आहे. राष्‍ट्रीय हरीत लवादानेही महाकुंभवेळी पाण्यातील मानवी मलमुत्राचे प्रमाणही नियमानुसार असून प्रति१०० एमएल मध्ये २००० पेक्षा कमी एमपीएन एवढे आहे असे स्‍पष्‍ट केले आहे. सेंट्रल पोल्‍युशन कंट्रोल बोर्ड (CPCB) ने प्रति १०० एमएल पाण्यात २००० एमपीएन (Most Probable Number )प्रमाणाला काही अपवादात्‍मक वेळा परवाणगीयोग्‍य आहे असे म्‍हटले. हे प्रमाण ५०० एमपीएन अगदी योग्‍य आहे.

योगी आदित्‍यनाथ यांनी या गोष्‍टींचा संदर्भ घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाकुंभला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्‍याचा आरोप त्‍यांनी यावेळी केला. काही लोक महाकुंभ मेळा बदनाम करण्यासाठी कॅम्‍पेनिंगच चालवत आहेत असेही ते म्‍हणाले. केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्रयागराजमध्ये ७३ ठिकाणांहून पाण्याचे नमूने गोळा करुन त्‍याची चाचणी केली होती. यासाठी सहा वेगवेगळे निकष लावले होते. पाणि किती आम्‍लयुक्‍त किंवा अल्‍कधर्मीय आहे याची तपासणी करुन हा अहवाल राष्‍ट्रीय हरीत लवादाकडे दाखल केला होता. हरीत लवादापुढे प्रयागराजमधील पाण्यात मलनिसाःरण करु नये अशा मागणीची याचिका दाखल आहे. त्‍यावर सध्या सुनावणी सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news