Adani-Hindenburg Case: हिंडेनबर्ग प्रकरणातील पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

तपास एसआयटी, सीबीआयकडे सोपवण्यास नकार
Adani-Hindenburg case
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. Pudhari News Network
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात ३ जानेवारीच्या न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या याचिकेमध्ये हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपांची चौकशी एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. यापूर्वी ३ जानेवारीच्या निर्णयामध्ये अदानी समूहाकडून शेअरच्या किंमतीत फेरफार केल्याच्या आरोपांचा तपास एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाने नकार दिला होता.

Adani-Hindenburg case
अदानी हिंडनबर्ग वादावर केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली प्रथमच प्रतिक्रीया | (Nirmala Sitharaman On Adani-Hindenburg Row)

Summary

  • अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील पुनर्विचार याचिका

  • हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोपांची चौकशी एसआयटी किंवा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी

  • याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Adani-Hindenburg case
Adani-Hindenburg row | अदानी- हिंडनबर्ग प्रकरण : सुप्रीम कोर्टाकडून सहा सदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना

रेकॉर्डमध्ये कोणतीही स्पष्ट त्रुटी नाही.

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सुनावणी घेतली. पुनर्विचार याचिकेवर विचार केल्यानंतर आम्हाला आढळले की, रेकॉर्डमध्ये कोणतीही स्पष्ट त्रुटी नाही. सर्वोच्च न्यायालय नियम, २०१३ च्या आदेश एक्सएलव्हीआयआय नियम १ अंतर्गत पुनर्विचारासाठी कोणतेही प्रकरण तयार केले जात नाही. त्यामुळे पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली असल्याचे न्यायालयाने सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news