जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये उमेदवारीवर शिक्कामोर्तब
The second list of Congress candidates for the Jammu and Kashmir assembly elections has been announced
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीरPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह नेते उपस्थित होते. बैठकीनंतर उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली.

The second list of Congress candidates for the Jammu and Kashmir assembly elections has been announced
नागपूर विधान परिषद निवडणूक : भाजपचा विजय; काँग्रेसची ऐनवेळी उमेदवार बदलण्याची रणनिती ठरली अपयशी

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांना मध्य शालतेंग मतदारसंघातून तिकीट दिले. तर रियासीमधून मुमताज खान यांना उमेदवारी देण्यात आली. भूपेंद्र जामवाल यांना श्री माता वैष्णव देवी येथून तिकीट देण्यात आले. तर राजौरीतून पक्षाने इफ्तार अहमद यांना उमेदवारी दिली. थन्नामंडीमधून शब्बीर अहमद खान आणि सुरणकोट मतदारसंघातून मोहम्मद शाहनवाज चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. या अगोदर काँग्रेसने जम्मू-काश्मीर विधानसभेसाठी ९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news