जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकसभा निवडणूकीसारखाच विधानसभेत दिला कौल

J&K Assembly election 2024 Result
जम्मू-काश्मीरच्या जनतेने लोकसभा निवडणूकीसारखाच विधानसभेत दिला कौलfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालात जो कौल जनतेने दिला होता, त्यासारखाच परिणाम जम्मू-काश्मीरच्या जनतेने विधानसभेत दिला आहे. लोकसभा निवडणुकीत नॅशनल कॉफरन्सने ३६, काँग्रेसने ७, भाजपने २९, पीडीपीने ५ विधासभा मतदारसंघामध्ये लीड मिळाली होती. आता विधानसभा निवडणूक निकालात नॅशनल कॉन्फरन्सला ४२, काँग्रेसला ६, भाजपला २९, पीडीपीला ३ जागांवर विजयी मिळवता आला आहे.  

जम्मू-काश्मीरमध्ये ५ लोकसभा मतदारसंघ आहेत. २०२४ लोकसभा निवडणुकीत या पाच मतदारसंघापैकी २ जागांवर इंडिया आघाडी, २ जागांवर भाजप आणि १ जागेवर इंजिनियर राशीद यांनी विजय मिळवला होता. त्यांपैकी श्रीनगर, अनंतनाग जागांवर इंडिया आघाडीच्या नॅशनल कॉफरन्स पक्ष, जम्मू आणि उधमपूर या मतदारसंघामध्ये भाजप तर बारामुल्ला मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार राशीद इंजिनियर यांचा विजय झाला. वरवर पाहता एनडीए आणि इंडिया आघाडीला समान जागा मिळाल्या. मात्र मतदानाच्या टक्केवारी नजर टाकल्यास इंडिया आघाडी पुढे दिसते. इंडिया आघाडीतील नॅशनल कॉफरन्सला २२.३० टक्के, काँग्रेसला १९.३८ टक्के, भाजपला २४.३६ टक्के, पीडीपीला ८.४८ टक्के मते मिळाली होती. यावरुन इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या समोर असल्याचे स्पष्ट झाले होते. तशीच मतांची टक्केवारी विधानसभा निवडणुकीत पक्षांना मिळालेली आहे. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला २३.४४ टक्के, काँग्रेसला ११.९७, भाजपला २५.६३ टक्के, पीडीपीला ८.८७ टक्के मते मिळाली आहेत.

काश्मीर घाटीत नॅशनल कॉन्फरन्सचे वर्चस्व, जम्मूत भाजपला मोठा विजय

जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ९० जागांपैकी काश्मीर घाटीमध्ये ४७ आणि जम्मू भागात ४३ मतदारसंघ आहेत. त्यांपैकी काश्मीर घाटीमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीसह इतर प्रादेशिक पक्षांमध्ये लढत झाली होती. यामध्ये निकालात नॅशनल कॉन्फरन्सने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. तर जम्मूमधील ४७ पैकी २९ जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे.  

मेहबूबा मुफ्ती, राशीद इंजिनियर, गुलाम नबी आझाद यांना झटका

दशकभरापूर्वी जम्मू-काश्मीरात विधानसभा निवडणूक झाली. तेव्हा मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळेस त्यांना मोठा झटका बसला असून केवळ ३ जागांवर विजय मिळाला आहे. गुलाम नबी आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसीव्ह आझाद पक्ष, राशीद इंजिनियर यांचा जम्मू-काश्मीर अवामी इत्तेहाद पक्ष यांनाही या निवडणुकी काहीच करता आले नाही. निवडणुकीअगोदर राशीद इंजिनियर यांच्या चर्चा होत्या मात्र, त्या केवळ चर्चाच राहिल्या.

ओमर अब्दुल्लांचा दोन्ही जागांवर विजय, काँग्रेस प्रदेशाध्य विजयी

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी गांदरबल आणि बडगाम या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्या दोन्ही जागांवर ते विजयी झाले. पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीगुफ्वारा – बिजबेहारा या मतदारसंघात त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव झाला. भाजपचे जम्मू-काश्मीर प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना नौशेरा या मतदारसंघातून पराभूत झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक हामीद कारा यांचा सेंट्रल शेल्टेंग मतदारसंघातून विजय झाला. तर आम आदमी पक्षाचे मेहराज मलिक यांनी डोडा मतदारसंघातून विजय मिळवत पक्षाच्या विजयाचे जम्मू-काश्मीरमध्ये खाते उघडले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news