चक्क भुताने एफआयआर नोंदविला; न्यायमूर्तींना जबरदस्त धक्का बसला

बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे प्रकरण
Allahabad High Court
चक्क भुताने एफआयआर नोंदविलाfile photo
Published on
Updated on

अलाहाबाद : येथील उच्च न्यायालयात चक्क भूत तक्रारदार असलेल्या असामान्य प्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. एका व्यक्तीने स्वतःच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी फसवणूक आणि बनावट दस्तावेजाचा एफआयआर दाखल केल्याचे हे प्रकरण आहे.

पुरुषोत्तम सिंग यांनी त्यांच्यासह चारजणांविरुद्ध फसवणूक व बनावट दस्तावेज तयार केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्यावर शब्द प्रकाश यांनी जमिनीच्या वादातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा त्यांचा दावा होता. शब्द प्रकाश यांच्या वतीने अधिवक्ता विमलकुमार पांडे यांनी 19 डिसेंबर 2023 रोजी ममता देवी यांच्या स्वाक्षरीने हायकोर्टात वकालतनामा दाखल केला आहे. वास्तविक, शब्द प्रकाश यांचा मृत्यू 19 डिसेंबर 2011 रोजीच झाला होता. हे प्रकरण सुनावणीला आले तेव्हा न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांनी आपल्याला धक्का बसल्याचे सांगत या खटल्याची कार्यवाहीच रद्द केली. तसेच, संबंधित पोलिसांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news