

पुढारी ऑनलाईन :
केदारनाथ धामचे कपाट आज (रविवार) बंद होणार आहेत. आज पहाटे ४ वाजल्यापासून विधी विधानासह पूजा केली जात आहे. सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास कपाट बंद करण्याचा मुहुर्त आहे. आता ६ महिण्यांसाठी केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद होणार आहेत. या काळात उखीमठ या ठिकाणी केदारनाथाचे दर्शन घेता येणार आहे. (kedarnath)
भाऊबीजच्या दिवशी केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. पंचमुखी मूर्ती डोलीमध्ये ठेवून नेण्यात येते. चालती विग्रह डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर येथे पोहोचेल. गौरीकुंड, सोनप्रयागमार्गे ही डोली आज रामपूरला पोहोचेल. केदारनाथ ५ नोव्हेंबरला ओंकारेश्वरमध्ये विराजमान होतील.
या वर्षी १६ लाख लाेक केदारनाथ धाम दर्शनासाठी आले होते. गेल्या ६ महिन्यात १ लाख तीर्थयात्री केदारनाथाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. आजपासून यमुनोत्री धामचे कपाटही बंद होणार आहेत.
सकाळी साडेआठ वाजता मंदिराचे मुख्य कपाट बंद करण्यात आले. हजारो भाविक यावेळी केदारनाथ दर्शनासाठी मंदिरात आले होते. संपूर्ण मंदिर परिसर १० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले हाेते. आज केदारनाथच्या पंचमुखी मुर्तीला चल विग्रह डोली च्या माध्यमातून उखीमठसाठी रवाना करण्यात आले.
गौरीकुंड येथून सोनप्रयाग मार्गे ही डोली आज रात्री रामपूर येथे विसावणार आहे. यानंतर ५ नोव्हेंबरपासून उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात केदारनाथचे दर्शन होणार आहे. संपूर्ण हिवाळ्यात केदारनाथ येथेच विराजमान असतात. यावर्षी 16 लाखांहून अधिक भाविकांनी केदारनाथचे दर्शन घेतले आहे. गेल्या सहा दिवसांत सुमारे १ लाख भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. आज दरवाजे बंद होताना हजारो भाविकांनी केदारनाथांचे दर्शन घेतले. यावेळी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता.