PM Kisan 20th Installment | पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा 20 वा हप्ता 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

PM Kisan 20th Installment | e-KYC, बँक तपशील किंवा मोबाईल क्रमांक अपडेट करा, तुमचं नाव यादीत आहे का? तपासा...
PM Kisan 20th Installment
PM Kisan 20th InstallmentFile Photo
Published on
Updated on

PM Kisan 20th Installment Rs. 6000 PM Modi Bihar Visit

नवी दिल्ली: देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) 20 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे.

20 वा हप्ता कधी जमा होईल?

मिळालेल्या माहितीनुसार, 18 किंवा 19 जुलै 2025 रोजी ही रक्कम खात्यात जमा केली जाऊ शकते. मात्र, अधिकृत घोषणेसाठी अद्याप प्रतीक्षा आहे.

केवळ 2 दिवस उरलेत – लगेच करा हे अपडेट

पंतप्रधान मोदी 18 जुलै रोजी बिहारच्या मोतिहारी दौऱ्यावर असतील आणि अशी चर्चा आहे की तिथूनच ते 20 वा हप्ता वितरित करतील. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC, बँक तपशील किंवा मोबाईल क्रमांक अपडेट केलेले नाहीत, त्यांनी त्वरित हे सर्व पूर्ण करावे.

PM Kisan 20th Installment
CDS Anil Chauhan | जुन्या शस्त्रांच्या जोरावर युद्ध जिंकता येणार नाही; परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोकादायक...

वर्षाकाठी 6000 रुपये मदत कशी मिळते?

PM किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी ₹6000 ची आर्थिक मदत दिली जाते. ती तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते:

  1. एप्रिल- जुलै

  2. ऑगस्ट - नोव्हेंबर

  3. डिसेंबर - मार्च

19 वा हप्ता: 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 9.8 कोटी शेतकऱ्यांना 22000 कोटींची रक्कम वितरित केली होती.

तुमच्या खात्यात वेळेवर रक्कम येण्यासाठी काय करावे?

  • 20 व्या हप्त्याची रक्कम मिळवण्यासाठी पुढील गोष्टी तातडीने पूर्ण करा:

  • e-KYC पूर्ण करा

  • वेबसाइटवर OTP द्वारे किंवा जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिकद्वारे करता येते.

  • e-KYC केल्याशिवाय हप्ता जमा होणार नाही.

  • आधार बँक खात्याशी लिंक करा

  • खात्यातील IFSC कोड, खाते क्रमांक इ. माहिती योग्य आहे का ते तपासा.

PM Kisan 20th Installment
GST 12% slab removal | जीएसटीमध्ये 12 टक्के स्लॅब रद्द करण्यास PMO ची मंजुरी; ग्राहकांना दिलासा, उद्योगांसाठी सुलभता...

नाव लाभार्थी यादीत आहे का ते कसे तपासायचे?

यादीत नाव तपासण्यासाठी वेबसाईट: pmkisan.gov.in वर जावा. Beneficiary List मध्ये राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून तपासा.

Farmer Registry अनिवार्य

केवळ PM किसानमध्ये नोंदणी असून चालणार नाही, आता Farmer Registry अनिवार्य आहे. राज्य पोर्टलवर किंवा CSC केंद्रावर अर्ज भरू शकता, किंवा ‘Farmer Registry App’ वापरा.

केवळ तेच लाभार्थी हप्ता मिळवतील ज्यांची माहिती वेळेवर अपडेट केली गेली आहे. त्यामुळे आजच सर्व कामे पूर्ण करा: eKYC, बँक तपशील चूक नसणे, Beneficiary List मध्ये नाव तपासणे, Farmer Registry इत्यादींमुळे तुम्हाला ना फक्त वेळेवर हप्ता मिळेल, तर पुढील हप्त्यांमध्येही कोणतीही अडचण येणार नाही.

स्टेटस कसा तपासायचा?

हप्ता जमा झाल्यावर pmkisan.gov.in वर ‘Beneficiary Status’ मध्ये जाऊन तुमचा हप्त्याचा स्टेटस तपासा. त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news