Thalapathy Vijay Politics: अभिनेता थलपती विजयचा उदय! तामिळनाडूत नवख्या टीव्हीकेने इतिहास घडवला

107 हून अधिक जागांवर मुसंडी
Thalapathy Vijay Politics
Thalapathy Vijay PoliticsPudhari
Published on
Updated on

चेन्नई: अभिनेत्याकडून अल्पावधीतच राजकीय नेतेपदावर पोहोचलेल्या सी. जोसेफ विजय ऊर्फ थलपथी यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत सत्तास्थापनेवर शिक्कामोर्तब केले आहे. सिनेमाच्या पडद्यावरून थेट राजकीय पडद्यावर उतलेल्या त्यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) तमिळनाडूमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

त्यांनी रात्री उशीरापर्यंतच्या आकडेवारीनुसार, 234 जागांपैकी पक्षाने 32 जागा जिंकल्या असून 75 हून अधिक जागांवर आघाडी घेतली होती. प्रारंभी या पक्षाचे उमेदवार पिछाडीवर होते, मात्र त्यानंतर टीव्हीकेने जोरदार पुनरागमन करत सत्ताधारी डीएमके आणि एडीएमके यांसारख्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले आहे.

Thalapathy Vijay Politics
Assam Election Result: आसामात भाजपची हॅट्ट्रिक! काँग्रेसचा धुव्वा; भाजप 102 जागांसह आघाडीवर

टीव्हीकेच्या विजयातील ठळक मुद्दे

सर्व 234 जागांवर कोणाशीही युती न करता स्वतंत्र निवडणूक लढवली टीव्हीकेच्या मिळणारा जनाधार आणि विजयाच्या आत्मविश्वासावर ठाम सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकला चलो रेची रणनीती शेवटपर्यंत पाळली थेट संपर्क आणि संवाद मतदारांना भावला.

एकला चलो रेची भूमिका

विजय यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्व 234 मतदारसंघांत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यंदाची विधानसभा निवडणूक , द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम -भारतीय जनता पक्ष यांच्यातील तीव्र तिहेरी लढतीमुळे सुरुवातीलपासूनच चर्चेत होते.

Thalapathy Vijay Politics
West Bengal election: भाजपने ममतांची 15 वर्षांची सत्ता उलथवली

राजकीय प्रवेश आणि पार्श्वभूमी

जोसेफ विजय चंद्रशेखर यांनी 2 फेब्रुवारी 2024 रोजी तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) या पक्षाची स्थापना केली होती. 8 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाकडे या पक्षाची अधिकृत नोंदणी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news