

The iconic chase तामिळनाडू राज्यातील विधानसभेचा आज निकाल लागला, यामध्ये तामिळ चित्रपटसृष्टीतील स्टार विजय थलपती याने जोरदार मुसंडी मारली आहे. त्याच्या तमिळ वेट्टी कझगम TVK या पक्षाने 112 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्याच्या चित्रपटाप्रमाणेच तामिळ जनेतेने विजयला डोक्यावर घेतले आहे. द्रवीडी पक्षांच्या कडवट अस्मितेला टक्कर दिली. सर्वच घटकांना सामावून घेण्याच्या प्रयत्नाला साथ मिळाली आहे.
रिलमधील नायक ते रिअलमधील नायक
विजयने 2024 मध्ये पक्ष स्थापन केल्यापासूनच मोठ्या प्रमाणात त्याला जनाधार मिळत गेला. आजच्या निकालातून हे स्पष्ट झाले आहे. त्याची चित्रपटातील नायकाची प्रतिमा जनतेला भावली असून राजकारणातही नायक होण्याची संधी मिळाली आहे. आतापर्यंत त्याने चित्रपटात जी जनतेसाठी उभारणारा नायक ही प्रतिमा तयार केली आहे. आता त्याला रिअर लाईफमध्येसुद्धा तीच संधी मिळाली आहे.
मास्टर चित्रपटातील सिन होतोय व्हायरल
2021 मध्ये थलापती विजय व विजय सेतूपती या चित्रपटातील एक सिन सध्या तामिळनाडूमधील निकालानंतर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये विजय हे एका बसचा पाठलाग करत आहेत. या बसमध्ये काही लोक बसलेले असतात. या बसच्या पाठीमागून धावत विजय येतो खिडकी जवळ बसलेलेल्यांना म्हणतो की मी येणार आहे. त्यानंतर तो धावत्या बसमध्ये चढतो. व त्यांनतर बसमधील सिन दाखवला आहे यामध्ये तो सिटवर बसलेल्याना आता उतरा असे म्हणतो
सध्याच्या राजकीय निकालावर परफेक्ट भाष्य करणारा सिन
या सिन मध्ये दाखवल्या प्रमाणे अगदी नवखा असलेला टीव्हिके पक्ष व विजय यांनी तामिळनाडूच्या राजकीय बसचा पाठलाग केला आहे. वेगाने धावत जाऊन ती बस पकडली आहे. दोन वर्षापूर्वी स्थापन केलेल्या टीव्हिके पक्षाने DMK, ADMK या सारख्या गेल्या 50 वर्षापासून तामिळनाडूच्या राजकारणात घट्ट पाय रोवलेल्या पक्षांना खिळखिळं केल आहे ते ही पहिल्याच डावात. तामिळ अस्मितेच्या जीवावर राजकीय बस दामटणाऱ्या या पक्षांना विजय यांनी पाठीमागून धावत येऊन गाठले आहे. द आयकॉनिक चेस नावाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत तामिळनाडूतील राजकीय परिस्थितीवर परफेक्ट भाष्य केले आहे.
प्रस्थापितांना उतरवण्याचा इशारा
या बसमध्ये चढल्यावर चित्रपटातील नायक थलापती विजय हा त्या संबधितांना तुम्ही खाली उतरा असा इशारा करतो. यावेळी बसलेल्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. अशीच परिस्थिती आज तामिळनाडूत झाली आहे.थलापती यांनी पाठीमागून धावत येऊन तामिळनाडूची राजकीय बस पकडली आहे. व प्रस्थापितांना ते सांगताहेत आता ही बस मी हाकणार आहे. सिनमधील प्रवाशांच्या चेहऱ्यावरील जे भाव आहेत तसेच भाव आज तामिळनाडूच्या प्रस्थापित राजकीय हस्तींच्या चेहऱ्यावर आहेत.
अनिरुद्धच्या म्युझिकची जादू
मास्टर या चित्रपटाला अनिरुद्धचे म्युझिक आहे. बसचा पाठलाग करताना या सिनच्या पार्श्वभूमिवर ‘थलपती’ हे थीम साँग वाजते आहे. चेस करताना सिन व म्युझिक यांचा अतिशय रोमांचकारी संगम या व्हिडीओत दिसून येतो.