

Tesla car to 'fly' over a toll plaza memes take social media by storm
पुढारी ऑनलाईन : एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीने गुरुवारी एका लाइव्हस्ट्रीम कार्यक्रमात आपली नेक्स्ट जनरेशन रोडस्टर कार सादर केली. या कारच्या डेमोमध्ये तिने असे काही करून दाखवले की, पाहणारे थक्क झाले. कार एका रॅम्पवर चढताना उलटी झाली आणि त्यानंतर हवेत उडू लागली. कारच्या खालच्या बाजूला बसवलेले थ्रस्टर्स सुरू झाले आणि कारने हवेत कसरती करत पुन्हा जमिनीवर लँडिंग केले.
दुसऱ्या एका डेमोमध्ये कार वेगाने अनेक कारच्या रांगेच्या दिशेने गेली. त्यानंतर हवेत उड्डाण करून कारच्या रांगेवरून किकफ्लिप करत ती दुसऱ्या बाजूला सुरक्षितपणे उतरली. हे दृश्य एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटापेक्षा कमी नव्हते. मात्र, हवेत उडणाऱ्या आणि हवेतच कसरती करणाऱ्या या कारची खिल्ली उडवायला इंटरनेटवरील युजर्सनी फारसा वेळ लावला नाही. काही मिनिटांतच टेस्लाच्या या कारवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला.
टेस्लाची कार उडाली, मीम्सचा धुमाकूळ!
टेस्लाच्या उडणाऱ्या कारवर अनेक परदेशी सोशल मीडिया अकाउंट्सवर मीम्स बनवण्यात आले आहेत. मात्र, यातील सर्वाधिक मजेशीर मीम्स आपल्या देसी युजर्सचे आहेत.
एका युजरने AI च्या मदतीने एक व्हिडिओ तयार केला. त्यात भारतात टेस्लाची कार उडेल खरी, पण हवेत तिच्यासोबत काय होईल, हे तुम्ही स्वतःच पाहा, असे दाखवण्यात आले.
दुसऱ्या एका युजरने टेस्लाची फ्लाइंग कार टोल बूथच्या वरून फ्लिप मारून उडताना दाखवली. यावर अनेकांनी कमेंट करत म्हटले, ‘ही तर टोलही पार करेल!’
आणखी एका युजरने AI व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये पुढे पोलिसांचा नाकाबंदीचा बंदोबस्त असतो आणि समोरून टेस्ला रोडस्टर कार येत असते. मात्र, अचानक ही कार हवेत उडते आणि पोलिसांना चकवा देत गायब होते.
एका युजरने फोटो पोस्ट करून दाखवले की, भविष्यात उडणाऱ्या गाड्यांचा विचार करून फूड आउटलेट्सही हवेतच तयार केली जातील.
X वरील एका युजरने व्हिडिओ पोस्ट करत टेस्ला रोडस्टर कारचा रस्त्यावरील पहिला दिवस कसा असेल, हे दाखवले.
तर एका युजरने भारतीय रोडवरून टेस्ला कार जात असताना अचानक ट्रॅफीक लागते. तेंव्हा टेस्ला कार हवेतून जात ट्रॅफीक पार करते पण अचानक हवेतील विद्युत तारांमध्ये कार अडकते असे दाखवण्यात आले आहे.