पुढारी ऑनलाईन डेस्कः जम्मू काश्मिर च्या बारामुल्ला जिल्ह्यातील गांदरबल येथे भारतीय लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन नागरिक व एक पोर्टर यांचा मृत्यू झाल्याची माहीती मिळत आहे. तर चार जवान जखमी झाले आहेत. एका अधिकाऱ्यांने सांगितले की एका लष्करी तळाकडून दुसऱ्या तळाकडे जाताना वाहनांच्या ताफ्यातील एका वाहनावर हा हल्ला झाला.
मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी बोटा पथरी या भागात दबा धरुन बसले होते. वाहने जात असताना त्यांनी संधी साधून हल्ला केला. यामध्ये एक पोर्टर जखमी झाला पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लष्काराने दहशतवादी शोधण्यासाठी मोहिम सुरु केली आहे. गेल्या काही दिवसात अशा हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. गांदरबल जिल्हयात एकाचवेळी सात नागरिकांची गोळया घालून हत्या करण्यात आली. गुरुवारी ही एका स्थानिकावर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात जम्मू काश्मिरचे मुख्यमंत्री ओमर अब्दूला यांनी सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे.