स्वातंत्र्यादिनापूर्वी दहशतवाद्याला अटक; पोलिसांनी शस्त्रे जप्त केली

दहशतवादी आयएसआयएसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित
Terrorist arrested in Delhi
दिल्लीमध्ये दहशतवाद्याला अटकPudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलला 15 ऑगस्टपूर्वी मोठे यश मिळाले आहे. स्पेशल सेलने रिझवान नावाच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. रिझवान हा ISIS मॉड्यूलचा दहशतवादी असल्याचा पोलिसांचा दावा आहे. तो दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. १५ ऑगस्टपूर्वी काही मोठी दहशतवादी घटना घडवून आणण्याची त्याची योजना होती, असे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रिझवान आयएसआयएसच्या पुणे मॉड्यूलशी संबंधित होता. एनआयएने रिझवान आणि त्याच्या काही साथीदारांवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. स्पेशल सेलने यापूर्वी काही दहशतवाद्यांना अटक केली होती. रिझवान अनेक वर्षांपासून फरार होता. स्पेशल सेलने त्याला जुनी दिल्ली दर्यागंजजवळून अटक केली आहे आणि त्याच्याकडून काही शस्त्रेही जप्त केली आहेत, ज्यात पिस्तुलाचा समावेश आहे.

दिल्लीतील व्हीआयपी भागांची रेकी

मिळालेल्या माहितीनुसार, रिजवानने दिल्लीतील काही व्हीआयपी भागांची रेस केली होती. 15 ऑगस्टपूर्वी काही मोठी दहशतवादी घटना घडवून आणण्याचा त्याचा कट होता, असा संशय व्यक्त केला जात आहे. याआधी त्याला स्पेशल सेलने अटक केली होती.

ऑक्टोबर 2023 मध्ये, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ISIS पुणे मॉड्यूलचा दहशतवादी शाहनवाजसह मोहम्मद अर्शद वारसी आणि रिजवान नावाच्या संशयितास अटक केली होती. या मॉड्यूलचा आणखी एक संशयित दहशतवादी रिझवान हा फरार होता, त्याच्यावर एनआयएने 3 लाखांचे बक्षीसही ठेवले होते. याच रिझवानला स्पेशल सेलने अटक केली आहे. ISIS पुणे मॉड्यूल प्रकरणात NIA ने 7 जणांना अटक केली होती. यावेळी तीन दहशतवादी पळून गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news