

नवी दिल्ली : मोबाईलवरील गेमचे व्यसन जडलेल्या दहा वर्षीय मुलाने येथील नांगलोई भागात जीवन संपवल्याची केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी सांगितले की, संबंधिता मुलगा एमसीडी शाळेत शिकत होता आणि त्याला मोबाईल गेमचे व्यसन जडले होते. तो त्याच्या पालकांसोबत अंबिका विहार कॉलनीत राहत होता. दोन्ही पालक नोकरी करतात. तो सतत सात तास फ्री फायर गेम खेळत होता आणि सुमारे चार तास युट्यूब पाहत होता.
31 जुलै रोजी मुसळधार पावसामुळे मुलगा शाळेत गेला नाही आणि पालक त्याला घरी सोडून कामावर गेले. संध्याकाळी परत आल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह लोखंडी पाईपला लटकलेला दिसला. मुलाने इतके मोठे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले याचा तपास पोलिस करत आहेत. मुलाच्या शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा आढळलेल्या नाहीत. वडिलांचे म्हणणे आहे की कोणीतरी त्यांच्या मुलाची हत्या केली आहे आणि त्याला आत्महत्येसारखे बनवले आहे. त्यांच्या मते, फास सुमारे 10 फूट उंचीवर होता. मुलगा तिथे पोहोचू शकला नसता.