तेलंगणा : बोगद्यात अडकलेले 'ते' ८ जीव सुटकेच्या प्रतीक्षेत, बचावकार्य सुरूच

बचाव पथकाकडून कटिंग मशीनव्दारे रॉड कापणे सुरू
Telangana SLBC tunnel collapse incident
तेलंगणा : बोगद्यात अडकलेले 'ते' ८ जीव सुटकेच्या प्रतीक्षेत, बचावकार्य सुरूचFile Photo
Published on
Updated on

तेलंगणा : पुढारी ऑनलाईन

तेलंगणातील एसएलबीसी बोगद्यात २२ फेब्रुवारी रोजी दुर्घटना घडली होती. या ठिकाणी बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्‍यामध्ये आठ कामगार बोगद्यातच अडकले आहेत. त्‍यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्‍न अजुनही सुरू आहेत. आज बचाव पथकाकडून कटिंग मशीनच्या मदतीने रॉड कापण्यात येत आहेत. या बचाव पथकाकडून सुरू असलेल्‍या बचावकार्याची ताजी दृश्ये एएनआय वृत्तसंस्‍थेच्या 'X' वर प्रकाशित केली आहेत.

तेलंगाणाच्या नगरकुरनूल जिल्ह्यात झालेल्‍या सुरूंग दुर्घटणेनंतर बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. सोमवारी जिल्‍हाधिकारी बी संतोष यांनी सांगितले की, लष्‍कर आणि एनडीआरएफ यांच्या सहकार्यातून हे बचावकार्य चालवण्यात येत आहे. उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांना वाचवणाऱ्या रॅट मायनर्सची टीम देखील रेस्‍क्‍यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेली आहे. शनिवारी बोगद्याचाचे छत कोसळल्‍यानंतर अडकलेल्‍या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी शेवटची राहिलेली ४० मीटरच्या अंतरापर्यंत पोहोचण्यासाठी यंत्रसामग्री तैनात केली जात आहे.

रेस्‍क्‍यू ऑपरेशनशनमध्ये रॅट मायनर्सचाही सहभाग

या दरम्‍यान उत्तराखंडच्या सिल्‍क्‍यारा बेंड-बरकोट बोगद्यात अडकलेल्‍या कामगारांना वाचवणाऱ्या 'रॅट मायनर्स' चे पथक दखील या बचाव कार्यात सहभागी झाले आहे. या ठिकाणी संपूर्ण काळजी घेत हे बचावकार्य सुरू असल्‍याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news