

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात टीडीपीचे नेते वकिती श्रीनिवासुलू यांचा निर्घृण ह्त्या करण्यात आली. , पक्षाचे नेते नारा लोकेश यांनी विरोधी पक्ष एसआरसीपीच्या कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टीडीपी नेते, माजी सरपंच वकिती श्रीनिवासुलू कर्नूलच्या पट्टीकोंडा उपविभागातील होसूर भागात असलेल्या त्याच्या शेताकडे जात होते. यावेळी त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कुरनूलचे पोलिस अधीक्षक (एसपी) गरिकापती बिंदू माधव यांनी सांगितले की, हत्येचा सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोर घटनास्थळाजवळ उपस्थित असल्याचा पुरावाही सापडला आहे. हत्या कौटुंबिक कलहातून झाली किंवा राजकीय पक्षांचा सहभाग आहे का, या सर्व बाजूंनी आम्ही तपास करत आहोत. या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत." दरम्यान, मंत्री आणि टीडीपी पक्षाचे सरचिटणीस नारा लोकेश यांनी हत्येमागे स्थानिक YSRCP कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
X वरील पोस्टमध्ये लोकेश यांनी म्हटलं आहे की, "मी TDP माजी सरपंच वकिती श्रीनिवासुलू यांनी कुरनूल जिल्ह्यातील होसूर, पत्तीकोंडा मंडल येथे वायएसपी जमावाने केलेल्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करतो. श्रीनिवासाची डोळ्यात मिरची टाकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जगन आणि कंपनी त्यांच्या जुन्या पद्धती न बदलता असे अत्याचार करत आहेत.