

tvk leader arrested: तमिळ नाडूमध्ये अभिनेता थलपती विजय याच्या पक्षाने निवडणुकीत मोठं यश मिळवलं. मात्र बहूमतापासून काही सीट मागे राहिलेल्या टीव्हीकेला आता सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. त्यातच त्यांना अजून एक मोठा धक्का बसला आहे. टीव्हीकेचा पदाधिकाऱ्याला १३ वर्षाच्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणात अटक झाली आहे. त्याच्यावर छळ आणि स्वतःचं जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गिनगी तालुक्यातील नरसिंगरायनपट्टई या ठिकाणी ही घटना घडली आहे.
आरोपी टी सर्वनन हा विजयाच्या टीव्हीकेचा ब्रँच ट्रेजरर आहे. तसोच तो टीव्हीकेच्या विल्लूपुरम वेस्ट आणि नॉर्थ जिल्हा सचिव गुना सर्वनन यांचा मेहुणा आहे.
गिनगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा गेल्या तीन महिन्यांपासून १३ वर्षाच्या मुलीचा पाठलाग करून तिचा छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोमवारी सर्वनन आणि तिची बहीण संगिता यांनी सर्वांसमोर त्या मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव मान्य करावा यासाठी हुज्जत घातली होती.
त्यानंतर घरी परतल्यानंतर या १३ वर्षाच्या मुलीने रात्री १०.३० वाजता आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. गिनगी पोलिसांनी सर्वननविरूद्ध कारवाई करून त्यांना अटक केली आहे. त्यांच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम 296 (b), 75 (1) (i) r/w 75 (2), 78 (2), 351 (3), 108 अंतर्गत तसेच तमिळनाडू महिला छळ विरोधी कायदा 4-B (2) चे कमल, Pocso अॅक्ट 9 (l) r/w 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वननला अटक केली असून तिची बहीण संगिता अजून मोकाट आहे.