

पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला आहे. सध्या सरु असलेल्या नीट (NEET), त्रिभाषा धोरण, वक्फ सुधारणा कायदा आणि सीमांकन यासारख्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करतो कारण राज्यांच्या हक्कांसाठीचा लढा आहे. पण गृहमंत्र्यांना वाटते की हे सर्व लक्ष विचलीत करण्याचा प्रकार आहे. त्यांनी अमित शहांना आव्हान दिले या मुद्द्यांवर तामिळनाडूच्या जनतेला त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावे. असे म्हटले
पुढे स्टालिन म्हणाले की अमित शहाच नाही तर कोणताही शहा हा तामिळनाडूवर राज्य करु शकत नाही. तामिळनाडू दिल्लीच्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आणि आमच्या राज्याला कायद्याच्या मार्गातून अडकवण्याचा प्रयत्न केला तर ते बंधन आम्ही तोडून टाकू.
पुढे त्यांनी म्हटले की २०२६ च्या सार्वत्रिक निवडणूकात द्रमुक पक्षाचेच राज्य येणार आहे. दिल्ली सरकारपुढे तामिळनाडू सरकार कधीच झुकणार नाही. नेत्यांच्या घरावर इडीचे छापे मारणे, पक्ष फोडणे व सरकार तयार करणे हे तामिळनाडूत चालणार नाही. २०२६ मध्ये केवळ द्रविडी विचारांचे सरकार स्थापन होणार आहे.