Constitution disrespect case
संसद परिसरात आंदोलन करताना मविआचे खासदारpudhari photo

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

Constitution Disrespect: मविआच्या खासदारांचे संसद परिसरात आंदोलन
Published on

नवी दिल्ली : परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि मागासवर्गीय निरपराध लोकांवर अन्यायकारक कारवाई थांबवावी, भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करणाऱ्यांची कसून चौकशी करावी, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले.

ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याला कोणी चिथावणी दिली होती का, हे तपासावे जेणेकरून यामागचा सुत्रधार कोण आहे हे समोर येईल, अशी मागणीही केंद्र सरकारसह राज्यातील महायुती सरकारला महाविकास आघाडीच्या खासदारांनी केली. संविधानाच्या रक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार यावेळी खासदारांनी व्यक्त केला.

यावेळी खासदार प्रणिती शिंदे महायुती सरकारवर टीका करत म्हणाल्या की, राज्यात भाजपची सत्ता येऊन आठवडा झाला नाही आणि महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यात अशा प्रकारची घटना घडली. परभणीमध्ये जे झाले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. दरम्यान, या आंदोलनाला खासदार प्रणिती शिंदेंसह, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, बळवंत वानखेडे, रवींद्र चव्हाण, गोवाल पाडवी, डॉ. प्रशांत पडोळे, डॉ. नामदेव किरसाण, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. शिवाजी काळगे, कल्याण काळे, अमर काळे, प्रतिभा धानोरकर, शामकूमार बर्वे आदी खासदार उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news