

नवी दिल्ली : मंबईतील २६/११ च्या हल्ल्लाचा सूत्रधार दहशतवादी तहव्वुर राणाचे प्रत्यार्पण मोदी सरकारच्या कूटनितीचे मोठे यश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. ज्यांनी भारतीय भूमी आणि भारतीय लोकांशी गैरवर्तन केले आहे, अशा सर्वांना भारतात परत आणण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे, असे ते म्हणाले. ज्यांच्या सरकारांच्या काळात हल्ला झाला ते सरकार राणाला परत आणू शकले नाही, अशी टीकाही अमित शाह यांनी काँग्रेसवर नाव न घेता केली. दिल्लीतील एका कार्यक्रमात अमित शाह बोलत होते.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणावरुन काँग्रेसवर टीका केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. यूपीए सरकारवर दहशतवादी अजमल कसाबबाबत सौम्यपणा दाखवल्याचा आरोप गोयल यांनी केला. यूपीए सरकारने कसाबला बिर्याणी खायला दिली असे ते म्हणाले. ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ला काँग्रेसच्या कार्यकाळात झाला. निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले मात्र, यूपीए सरकारने ठोस कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला.