Tahawwur Rana
Terrorist Tahawwur RanaFile Photo

तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका!

Tahawwur Rana | भारताकडे प्रत्‍यापर्णविरोधातील आपत्तकालीन याचिका फेटाळली
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : २००८ मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा (Tahawwur Rana)याच्या प्रत्‍यापर्णचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने राणा याची प्रत्‍यापर्णाविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. या निकालामुळे गेले अनेक वर्षे भारताला चकवा देणार दहशतवादी ताब्‍यात येणार आहे. यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राणा याची याचिका फेटाळली होती. ६४ वर्षीय पाकिस्‍तानी वंशाचा नागरिक असलेला राणा सध्या लॉस एंजलिसच्या मेट्रॉपॉलिटिन डिटेंशन सेंटरमध्ये बंद आहे. तो प्रत्‍यार्पण थांबविण्याचा प्रयत्‍न करीत आहे.

यापूर्वी २७ फेब्रुवारीला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातील न्यायाधिश जस्‍टिस एलेन यांच्याकडे भारताकडे प्रत्‍यार्पण थांबविण्यासाठी आपत्तकालीन याचिका दाखल केली होती पण मार्चच्या सुरवातीला न्यायाधीश कागन यांनी ही याचिका फेटाळली होती. अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटच्या माहितीनुसार तहव्वूर राणाने (Tahawwur Rana)चिफ जस्‍टिस रॉबर्टस यांच्यासकडे आपला विनंती अर्ज पाठवला अशी मागणी केली होती. तर ४ एप्रिलला राणाने केलेला अर्ज मुख्य न्यायाधिशांकडे पाठवण्यात आला होता. पण सोमवारी न्यायालयाने एका नोटीसीद्वारे राणा याचा अर्ज फेटाळला असल्‍याची माहिती दिली.

मी पाकिस्‍तानी असल्‍याने माझा झळ होईल

(Tahawwur Rana)राणा याने केलेल्‍या अर्जामध्ये म्‍हटले होते की मी मूळ पाकिस्‍तानी वंशाचा आहे. त्‍यामुळे भारताकडे प्रत्‍यार्पण केल्‍यास माझा झळ केला जाईल. मला सध्या अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्‍यामुळे प्रत्‍यार्पण रोखावे असे त्‍यांने म्‍हटले होते. यापूर्वीही प्रत्‍यार्पण होऊ नये यासाठी सुप्रीम कोर्टात आपत्तकालीन याचिका दाखल केली होती. अमेरिकेत त्याच्यावर खटला चालवून शिक्षा झाल्यानंतर भारत सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मात्र, त्याने विविध कायदेशीर उपाय योजत प्रत्यार्पणाला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news