

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वाती मालीवाल यांच्या कथित प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपी बिभव कुमार (दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय) यांनी अलीकडेच त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राच्या कोग्निझन्सला आव्हान देणारी फेरविचार याचिका दाखल केली आहे. त्यांचे प्रकरण तीस हजारी न्यायालयात प्रलंबित आहे.
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मालिवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे की, १३ मे रोजी त्या अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री निवासस्थानात भेटण्यासाठी गेले असता बिभव यांनी मारहाण केली. मालिवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 18 मे रोजी बिभव कुमारला अटक केली होती. बिभव कुमार तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. बिभवने 27 मे रोजी जामिनासाठी ट्रायल कोर्टात धाव घेतली, मात्र जामीन फेटाळल्यानंतर त्याने सत्र न्यायालयात दाद मागितली. तेथूनही निराश झाल्यानंतर बिभवने उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र उच्च न्यायालयानेही बिभवला दिलासा देण्यास नकार दिला. आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बिभवने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला.