

महू (मध्य प्रदेश); वृत्तसंस्था : भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पुणेस्थित ‘नाइबे लिमिटेड’ या संरक्षण तंत्रज्ञान कंपनीने आपल्या अत्याधुनिक ‘गरुडास्त्र’ १२० मिमी व्हेईकल-माउंटेड मोर्टार सिस्टीमचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले.
अशी आहेत ‘गरुडास्त्र’ची वैशिष्ट्ये
‘शूट अँड स्कूट’ तंत्रज्ञान : गरुडास्त्र केवळ ३० सेकंदांच्या आत फायरिंग पोझिशनमध्ये येते. अवघ्या १५ सेकंदात २ गोळे डागून, शत्रूच्या रडारला चकवा देण्यासाठी अवघ्या १५ सेकंदात आपले स्थान बदलू शकते.
प्रचंड वेग : अवघ्या दोन जवानांच्या मदतीने ही सिस्टीम ६० सेकंदात (१ मिनिटात) तब्बल १२ गोळे डागू शकते.
अचूक मारा : ७ ते १० किलोमीटर अंतरावरील शत्रूच्या लक्ष्याचा वेध घेण्यासाठी यामध्ये जीपीएस आणि लेझर मार्गदर्शित अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
बंकर उद्ध्वस्त करण्याची क्षमता : गरुडास्त्रमधून १७ किलो वजनाचा शक्तिशाली दारूगोळा डागला जातो, जो २० सेंमी जाडीचे काँक्रीटचे मजबूत बंकर एका फटक्यात उद्ध्वस्त करू शकतो.