छत्रपती संभाजीनगर, धाराशिववर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब

न्यायालयाचा नामांतर प्रक्रीयेत हस्तक्षेपास नकार
Supreme Court's seal on Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv Supreme Court's refusal to interfere in the name change process
छत्रपती संभाजीनगर, धाराशिववर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तबFile Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) वैध ठरवला आहे. नामांतराला काही जणांचा विरोध आणि काहींचा पाठिंबा असणारच असे सांगून न्यायालयाने नामांतर प्रक्रीयेत हस्तक्षेपास नकार दिला आहे.

Supreme Court's seal on Chhatrapati Sambhajinagar, Dharashiv Supreme Court's refusal to interfere in the name change process
NEET-UG 2024 | मोठी बातमी ! NEET पेपरफुटी काही राज्यांपुरती मर्यादित; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

न्या. हृषिकेष रॉय आणि न्या. भाटी यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत मुंबई उच्च् न्यायालयाने या अनुषंगाने दिलेला निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. नामांतराच्या निर्णयामुळे कुठेही तणाव पसरला नाही असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news