Supreme Court On Rahul Gandhi: तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल... राहुल गांधी यांच्या वर्तनुकीवर सर्वोच्च न्यायालय नाराज, बजावली नोटीस

सर्वोच्च न्यायालायने राहुल गांधी यांचे नाव न घेता याचिकाकर्त्यांच्या वर्तनावरून नाराजी व्यक्त केली.
Supreme Court On Rahul Gandhi
Supreme Court On Rahul Gandhipudhari
Published on: 
Updated on: 

Supreme Court On Rahul Gandhi: विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना १२ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढून सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरूद्ध याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालायने राहुल गांधी यांचे नाव न घेता याचिकाकर्त्यांच्या वर्तनावरून नाराजी व्यक्त केली. त्यांना त्यांच्या आचरणाबाबत स्पष्टीकरण देण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस तोंडी देण्यात आली आहे.

Supreme Court On Rahul Gandhi
Supreme Court on Reservation: हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्विकारल्यास मिळणार नाही आरक्षण... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना आता निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांना देखील नोटीस बजावली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या वर्तनुकीवर देखील ताशेरे ओढले.

Supreme Court On Rahul Gandhi
Supreme Court | रेल्वेच्या खिडकी तिकिटांवरही विमा संरक्षण बंधनकारक; २७ ऑक्टोबरपासून निर्णय लागू

दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात सरकारने न्यायालयाने आदेश देऊनही रेल्वे आणि मेट्रो स्टेशन का बंद ठेवली आणि इंडरनेट सेवा देखील का बंद केली याबाबतच्या अवमान याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी बिनशर्त माफी मागितली.

मात्र न्यायमूर्ती बागची यांनी कोर्टात ज्या प्रकारे तुम्ही युक्तीवाद करत आहात ते पाहता हा माफीनामा बिनशर्त नाही तर सशर्त आहे असं दिसतंय अशी टिप्पणी केली. तसेच त्यांनी या माफीनाम्याला आम्ही फारसं महत्व देत नाही असं देखील सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news