Supreme Court |आधार कार्ड, मतदार ओळखपत्र ग्राह्य धरा

सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगास निर्देश
Supreme Court
Supreme Court file photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: बिहारमधील मतदार यादी सुधारणा प्रक्रियेला विरोध करणार्‍या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सोमवारी, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने मतदार यादी जारी करण्यास अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. आधार कार्ड आणि मतदार ओखळपत्र स्वीकारण्याचे निर्देशही यावेळी न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले.

बिहारमधील मतदार यादी जारी करण्यास याचिकाकर्त्यांनी अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली होती. बिहारमधील मतदार यादी सुधारणा प्रक्रियेसाठी आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र स्वीकारणे सुरू ठेवण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला दिल्या. मतदार यादी जारी झाल्यानंतरही या प्रक्रियेसाठी अर्ज करता येतील, असे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितले.

दरम्यान, 10 जुलै रोजी न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने निवडणूक आयोगाला आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड वैध कागदपत्रे म्हणून विचारात घेण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रति-प्रतिज्ञापत्रात स्वीकारले आहे की आधार कार्ड, मतदार ओळखपत्रे आणि रेशनकार्ड स्वीकारले जाऊ शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news