Supreme Court Bhojshala Order : भोजशाला परिसरालगत शुक्रवारी नमाजसाठी परवानगी; सुप्रीम कोर्टाने दिले ‘हे’ निर्देश

सरन्‍यायाधीश सूर्य कांत यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी
Supreme Court Bhojshala Order
Supreme Court Bhojshala Order Pudhari
Published on
Updated on

Supreme Court Bhojshala Order : मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाला परिसराजवळ असलेल्या दर्ग्याची जागा मुस्लिमांना शुक्रवारी नमाजासाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. यासोबतच, दर शुक्रवारी दुपारी १ ते ३ या वेळेत या जागेवर मुस्लिमांना नमाज अदा करता येईल, अशी व्यवस्था करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत.

सरन्‍यायाधीश सूर्य कांत यांच्‍या अध्‍यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी

सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. "हा आदेश दिला असला तरीही, राज्य सरकार आणि मुस्लिम पक्ष परस्पर संमतीने शुक्रवारी नमाजासाठी इतर दुसऱ्या जागेचा पर्याय शोधू शकतात," असे खंडपीठाने स्पष्ट केले. यापूर्वी १४ जुलै रोजी खंडपीठाने या याचिकेचा अंतिम निर्णय होईपर्यंत भोजशालेजवळील मोकळी जागा नमाजासाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

मुस्लिम पक्षाची प्रशासनाविरोधात तक्रार

न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानंतरही मुस्लिम समाजाला नमाजासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली गेली नाही, अशी याचिका हाजी मुनीर अहमद यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. "धार जिल्हा प्रशासन भोजशाला परिसरापासून सुमारे १.३ किलोमीटर अंतरावर जागा देत आहे, परंतु ही जागा इतकी जवळ असावी जेणेकरून मुस्लिमांना तेथे सहज जाऊन नमाज अदा करता येईल," अशी तक्रार मुस्लिम पक्षाने केली होती.

Supreme Court Bhojshala Order
Bhojshala Case Supreme Court : "संवेदनशील मुद्दा..": भोजशाळेत शुक्रवारची नमाज पुन्हा सुरू करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

‘खसरा क्रमांक ५९६’ ची जागा मंजूर

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नमाजासाठी ‘खसरा क्रमांक ५९६’ ची जागा मंजूर केली आहे. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या ‘साइट प्लॅन’चा संदर्भ देत न्यायालयाने सांगितले की, "संबंधित जमिनीपर्यंत जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध आहे, त्यामुळे हे ठिकाण योग्य वाटते." तसेच ही जागा वादग्रस्त भोजशाला परिसराच्या अगदी लगत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

Supreme Court Bhojshala Order
Dhar Bhojshala case: भोजशाळा हे वाग्देवीचेच मंदिर, हिंदूंना पूजेचा अधिकार; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

हायकोर्टाने भोजशाला मानले होते हिंदू धर्मस्थळ

दरम्यान, १५ मे रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने भोजशाला-कमाल मौला मशीद प्रकरणात ऐतिहासिक निर्णय देताना हा संपूर्ण परिसर देवी सरस्वतीला समर्पित ‘वाग्देवी मंदिर’ असल्याचे घोषित केले होते. यासोबतच उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) दशकांचा जुना आदेश रद्द केला होता, ज्याद्वारे मुस्लिमांना दर शुक्रवारी भोजशाला परिसर नमाजासाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच केंद्र सरकार आणि ASI ने भोजशाला परिसराच्या व्यवस्थापन आणि प्रशासनाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशही उच्च न्यायालयाने दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news