'आरजी कार' बलात्कार-हत्‍या प्रकरण, पीडितेच्‍या पालकांना सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिलासा

नव्‍याने सीबीआय चौकशी मागणीसाठी उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी
RG Kar rape and murder Case
supreme court File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्‍या करण्‍यात आली होती. या प्रकरणी आज (दि. १७ मार्च) सर्वोच्‍च न्‍यायालयाने पीडितेच्या पालकांना सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे. तसेच या प्रकरणाची नव्‍याने सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणारी पीडितेच्या पालकांची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. ( RG Kar rape and murder Case)

सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की अर्जदार (पीडितेचे पालक) कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. पीडितेच्या पालकांसाठी वरिष्ठ वकील करुणा नंदी यांनी बाजू मांडली. भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सीबीआयचे प्रतिनिधित्व केले.

Kolkata RG Kar Doctor Case | घटनाक्रम

  • ९ ऑगस्ट २०२४ : रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमध्ये एका ३१ वर्षीय ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह सापडला. तिला बाह्य १६, तर अंतर्गत नऊ जखमा झाल्या होत्या. बलात्कारानंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

  • १० ऑगस्ट २०२४ : वाहतूक पोलिस स्वयंसेवक असणार्‍या संजय रॉयला अटक. वैद्यकीय कर्मचार्‍यांची आक्रमक मोहीम.

  • १२ ऑगस्ट २०२४ : हॉस्पिटलचे प्रमुख संदीप घोष बडतर्फ. डॉक्टरांचा देशव्यापी संप.

  • १३ ऑगस्ट २०२४ : पीडितेचे कुटुंबीय आणि अन्य काहीजणांची कोलकाता उच्च न्यायालयात धाव.

  • १४ ऑगस्ट २०२४ : संजय रॉय कोलकाता पोलिसांकडून सीबीआयच्या ताब्यात.

  • १५ ऑगस्ट २०२४ : देशभर रात्री मेणबत्ती मोर्चे काढत महिलांच्या सुरक्षिततेची मागणी.

  • १७ ऑगस्ट २०२४ : आयएएमचा देशव्यापी डॉक्टरांचा संप.

  • २० ऑगस्ट २०२४ : सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:हून प्रकरणाची दखल. वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांसाठी १० सदस्यीय टास्क फोर्स स्थापन.

  • २८ ऑगस्ट २०२४ : पोलिसांचे संदीप घोषसह रुग्णालयाशी संबंधितांच्या निवासस्थानावर छापे. सप्टेंबरच्या मध्यात घोषला पुराव्यात छेडछाड केल्याच्या आरोपावरून अटक. एफआयआर नोंदवण्यात उशीर केल्याबद्दल ताला पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली.

  • १८ जानेवारी २०२५ : न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले.

  • १९ जानेवारी २०२५ : संजय रॉयला सियालदह न्यायालयाचे न्यायाधीश अनिर्बान दास यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याला न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news