Chhattisgarh pension issue | कडक ऊन अन् सासूला पाठीवर घेत सुनेची पायपीट!

बँकेच्या बायोमेट्रिक नियमामुळे दरमहा पाच कि.मी.चा खडतर प्रवास
Chhattisgarh pension issue |
Chhattisgarh pension issue | कडक ऊन अन् सासूला पाठीवर घेत सुनेची पायपीट!
Published on
Updated on

रायपूर; वृत्तसंस्था : पेन्शनचे पैसे मिळवण्यासाठी एका सुनेला तिच्या 90 वर्षांच्या वृद्ध सासूला पाठीवर घेऊन तळपत्या उन्हात, नदी-नाले अन् खडकाळ रस्ते पार करत तब्बल पाच किलोमीटर पायपीट करावी लागल्याची धक्कादायक घटना छत्तीसगड राज्यात घडली.

सरगुजा जिल्ह्यातील कुनिया जंगलपारा गावातील सुखमनिया बाई असे या घटनेतील सुनेचे नाव आहे. तिची 90 वर्षांची सासू चालू शकत नाही. अनेक महिन्यांपासून सुखमनिया आपल्या सासूला पेन्शनचे पैसे मिळवून देण्यासाठी असेच पाठीवर घेऊन बँकेत आणत आहे. सध्या छत्तीसगडमध्ये अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा सुरू आहे. तरीदेखील 40-42 अंश तापमानात सुखमनिया सासूला पाठीवर बसवून, जंगलातील पाऊलवाटा आणि नदी-नाले पार करत नर्मदापूर येथील एक राष्ट्रीयीकृत बँक गाठतानाची घटना स्थानिक मीडियाच्या कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

बँक सखी योजना कागदावरच

कोरोना काळात छत्तीसगड सरकारने दुर्गम भागात ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना घरपोच पेन्शन देण्यासाठी बँक सखी योजना सुरू केली होती. मात्र, या दुर्गम भागात ही योजना कोलमडली आहे.

ओडिशातील थरारक घटना

काही दिवसांपूर्वी ओडिशातही अशीच घटना घडली होती. तेथे दियानाली गावातील जीतू मुंडा यांच्या बहिणीचे निधन झाले होते. बहिणीच्या बँक खात्यावर 19,300 रुपये जमा होते. ते पैसे देण्यासाठी बँकेने बहिणीला घेऊन येण्याचे फर्मान काढले. यामुळे जीतू मुंडा यांनी थेट आपल्या मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेत बँक गाठली होती.

अन्य पयार्य नाही ः सुखमनिया

सुखमनिया म्हणाल्या, पेन्शनचे 1500 रुपये मिळवण्यासाठी अंगठ्याचे ठसे किंवा बँक अधिकार्‍यांसमोर प्रत्यक्ष हजेरी लावावीच लागते. त्याशिवाय बँक पैसेच देत नाही. गावात वाहतुकीचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे सासूला पाठीवर वाहून आणणे हाच एकमेव पर्याय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news