Video viral: विंडो सीटसाठी महिलांनी उपटल्या एकमेकींच्या झिंज्या

विंडो सीटसाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
 women's fight Video viral
विंडो सीटसाठी दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झालीPudhari File Photo

हैदराबाद : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना जर खिडकीची सीट मोकळी झाली तर तिचा ताबा घेण्यासाठी झुंबड उडते. यातून कधी कधी वाद निर्माण होतो आणि क्वचितच हा प्रकार हमरीतुमरीवर येतो.

तेलंगणाात असेच घडले. बस डेपोमध्ये लागताच प्रवासी शक्य तितक्या वेगाने बसमध्ये चढू लागले. यादरम्यान दोन महिलांची नजर एकाच सीटवर गेली. दोघांनीही ती सीट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यातून भांडणाचा भडका उडाला.

आधी शिवीगाळ सुरू झाली आणि नंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघींनी अक्षरश: एकमेकांच्या झिंज्या उपटल्या. लाथा-बुक्क्यांची बरसात केली. हे भांडण इतके विकोपाला गेले की, पुरुष प्रवासीसुद्धा मध्यस्थी करायला घाबरत होते. बसमधील काही प्रवाशांनी हा प्रकार आपल्या कॅमेर्‍यात कैद केला आणि त्याचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news