महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यास सुरूवात

महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाचा आढावा घेण्यास सुरूवात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपच्या केंद्रीय पातळीवरील एका वरिष्ठ नेत्याकडून आढावा घेतला जात आहे. पक्षनेतृत्व आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जवळचे संबंध असलेल्या या नेत्याची केंद्रीय राजकारणात मोठी भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी भाजप अॅक्शन मोडवर आले आहे. त्यासाठीच या वरिष्ठ नेत्याकडून आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊनही भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी स्वीकारून सरकारमधून मोकळे करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. या संपुर्ण पार्श्वभूमीवर भाजपकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news