St Stephen College Shorts Ban: दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजात ‘शॉर्टस्‌’ बंदी, ‘मॉरल पोलिसिंग’ म्‍हणत विद्यार्थ्यांचा आक्षेप

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नोटीस
St Stephen College Shorts Ban: दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजात ‘शॉर्टस्‌’ बंदी, ‘मॉरल पोलिसिंग’ म्‍हणत विद्यार्थ्यांचा आक्षेप
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : ‘नीट’ पेपरफुटी आंदोलनात तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तोकड्या कपड्यातील फोटो आणि व्‍हिडीओ सोशल मीडियावर फिरल्‍यानंतर दिल्‍ली विद्यापीठांतर्गत येणार्‍या दिल्‍लीतील प्रसिद्ध सेंट स्टीफन्स कॉलेजने त्‍यांच्‍या विद्यार्थ्यांना शॉर्टस्‌ (हाफ पँट) घालून महाविद्यालयात येण्‍यास बंदी घातली आहे.

दिल्ली विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर कॉलेजच्या पहिल्याच दिवशी अनेक विद्यार्थी शॉर्टस् घालून आल्‍यानंतर कॉलेजने ही नोटीस जारी केली. वर्गांत, असेम्ब्ली‍ हॉल, लायब्ररी, डायनिंग हॉल व चॅपलमध्ये शॉर्टस् घालून येण्यास मनाई आहे, असे आदेशात म्‍हटले आहेे.

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नोटीस

कॉलेज कॅम्पसमध्ये लावण्‍यात आलेल्‍या नोटिसीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना ड्रेस कोडच्‍या नियमांचे पालन बंधनकारक असल्‍याचे म्‍हटले आहे. या नोटीसवर कॉलेजच्या नवीन प्राचार्या सुसान एलियास यांची स्वाक्षरी आहे. मात्र, हा नियम वरिष्ठ विद्यार्थ्यांनाही लागू होतो, असा दावा विद्यार्थ्यांनी केला.

विद्यार्थ्यांचा आक्षेप

दिल्ली विद्यापीठात ड्रेस कोडबाबत जारी या नोटीसवरून वाद सुरू झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रशासन त्यांच्या आवडीच्या कपड्यांच्या स्वातंत्र्यात हस्तक्षेप करीत असल्‍याचा आरोप करून याला ‘मॉरल पोलिसिंग’ म्हटले आहे. तथापि, काही विद्यार्थ्यांनी मात्र हा केवळ पारंपरिक नियम असल्‍याचे म्‍हटले आहे.

‘या’ विद्यार्थ्यांना फटका

या नियमाचा सर्वाधिक फटका सकाळच्या सरावासाठी अधिकृत स्पोर्टस्‌ किटमध्ये येणार्‍या क्रीडा खेळाडूंना बसत आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना यामुळे डायनिंग हॉलमध्ये प्रवेश दिला जात नसल्‍याचा दावा विद्यार्थ्यांनी केला. सध्या विद्यापीठाने या नियमाबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news