

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू - काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) बुधवारी (दि. १२) झालेल्या गोळीबारात एक लष्करी जवान जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवान नौशेरा सेक्टरमधील कलसियान भागातील एका चौकीवर तैनात होता. जखमी सैनिकावर प्राथमिक उपचार करून विशेष उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.
नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामागील कारणांचा तपास केला जात आहे. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परिसरातील झिरो लाईनवर स्फोट झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोळीबाराच्या तीन फैऱ्या झाडण्यात आल्या. स्फोटात कोणत्याही मोठ्या जीवित हानीचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.