

Snake Catcher Death आजकाल सर्पमित्र अनेकांच्या मदतिला धावून जात असतात. पण काही वेळा अतिउत्साही सर्पमित्र असतात जे विषारी सापांशी असे खेळत असतात की तो एखादा पाळीव प्राणी आहे. असाच एक प्रकार समोर आला आहे उत्तरप्रदेश मधील पिलभीत येथून समोर आला आहे. ज्यामध्ये सर्पमित्राचा लाईव्ह व्हिडीओमध्ये नाग चावल्यामुळे तडफडून धक्कादायक मृत्यू झाल्याचे दिसत आहे.
हाताला रुमाल बांधून नागाला बरणीत घालत होता
या व्हिडीओत दिसते की सापाला पकडल्यानंतर तत्काळ त्याला बरणीत घालून रेस्कयू करणे गरजेचे होते. पण अतिउत्साही सर्पमित्र त्या सापाबरोबर खेळ करताना दिसतो. तसेच आजूबाजूला अनेक लोक असतात त्यांच्या समोर तो सापाबरोबर मस्ती करताना दिसत आहे. अनेक वेळा तो साप चापण्याचा प्रयत्न करतो पण सर्पमित्र तो चुकवतो. पण शेवटी तो साप त्याच्या हाताच्या बोटाचा चावा घेतोच. यानंतर हाताच्या मनगटाला तो सर्पमित्र रुमाल बांधतो व लोकांकडून बरणी मागून घेतो. त्याला बरणीत घालत असतनाचा त्याची जीभ जड होते व त्याला बोलताही येत नाही. अचानक दुसरया क्षणी तो तडफडून बाजूला पडतो.
भला मोठा नाग पाहून जवळ जाण्याचेही कोणाचे धाडस नाही
या व्हिडीओत दिसते की सर्पमित्र हा एका इमारतीमधून एक भला मोठा नाग पकडून बाहेर आणतो. नंतर रस्त्यावर आल्यावर अतिउत्साहात सापाशी खेळ करू लागतो. सुरवातील हा साप शांत असतो पण सर्पमित्र त्या नागाला वारंवार डिवचाना दिसतो. त्यामुळे तो नाग चिडतो व चावण्याचा प्रयत्न करतो. पण नागाचा आकार बघून कोणीही जवळ येत असल्याचे दिसत नाही. प्लास्टिकची बरणीही लांबून फेकली जाते, तसेच सर्पमित्र तडफडत असताना त्याची मदत करण्यासही पुढे येण्याचे धाडस कोण करत नाही.
लाईव्ह व्हिडीओ, खतरोंसे खेल रहे है जे. पी.
साप पकडल्यानंतर सापचा आकार किती मोठा आहे है असे जे.पी. नामक सर्पमीत्र सागंताना दिसतो. बदूपूर पोलिस ठाण्यासमोरील इमारतीत हा साप पकडल्याचे व्हिडीओ करणारा सांगत असतो. तसेच तो सर्पमित्र सापाला ‘काट ले काट ले’ असे म्हणताना दिसतो. एकून खतरोंसे खेल रहे हे जे.पी दा असे व्हिडीओ करणारा म्हणतो. तेवढयात नाग डाव साधतो
दोन मिनिटात खेळ खल्लास
सापापुढे चुटकी वाजवून चाववण्यास प्रवृत करणरा जे.पी. शेवटी नागाचा शिकार होतोच. नाग दोन तिन वेळा चावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी बेसावध असताना वेगाने हाताच्या बोटाला धरतोच. या नागाचा चावा इतका जोरदार होता की. सर्पमित्र अगदी क्षणात तडफडू लागतो. त्याला श्वास घेण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येते. कोणीतरी बरणी फेकते पण तोपर्यंत सर्पमित्राचा खेळ खल्लास होतो. या व्हिडीओत दिसून येते की नाग शांत असतो. पण सर्पमित्राच्या चुकीच्या वागण्याने तो चिडतो व चावतो. यात कोणत्याही प्रकारे वन्यजीवाची चूक दिसून येत नाही.