Smriti Irani memories with Fadnavis: आजही आम्ही भेटतो त्या गोष्टीवरून हसतो; इराणींकडून फडणवीसांसोबतच्या आठवणींना उजाळा

Smriti Irani memories with Fadnavis
Smriti Irani memories with Fadnavispudhari
Published on
Updated on

Smriti Irani recalls memories with Fadnavis: भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय महसचिव स्मृती इराणी यांनी नुकतेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या राजकीय प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केलं. इराणी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेक केला आणि त्यांच्या सोबत पक्षात खूप आधीपासून काम करत असतानाच्या निर्माण झालेल्या आठवणींना देखील उजाळा दिला. स्मृती इराणी यांनी फडणवीस यांना पाहून गर्व होतो असं सांगितल.

Smriti Irani memories with Fadnavis
Smriti Irani Actress journey | वेट्रेस ते मॉडेल..स्मृती ईरानी कशी बनली 'इंडिया'ची आवडती 'तुलसी' बहू?

टाईम्स नाऊ शी बोलताना इराणी यांना विचारण्यात आलं की तुम्हाला लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून २ वर्षात कधी असं वाटलं नाही का की राज्यसभेचे तिकीट मिळेल, पक्ष वाटलं तर राज्यसभा देऊ शकते. यावर बोलताना इराणी यांनी आमच्या संघटनेत पदाचा अर्थ ओळख नसतो. तर संधी असते.

Smriti Irani memories with Fadnavis
Smriti Irani: नवीन क्यों की.... साठी स्मृति इराणी प्रत्येक एपिसोडमागे किती घेणार मानधन?

२४ वर्षापूर्वीच्या आठवणींना उजाळा

स्मृती इराणीने याबाबत बोलताना २४ वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, 'नाही आमच्या संघटनेच्या प्रवासात मी ज्या लोकांना पाहिलं आहे. मला या संघटनेत २४ वर्षे झाली. बाकीच्या लोकांना ही गोष्ट समजत नाही. मी ज्यावेळी पहिल्यांदा या संघटनेत आले ज्यावेळी आमच्यासाठी पद ओळख नाही तर संधी होती. मी २००३ मध्ये पहिल्यांदा पदाधिकारी झाले होते. भाजप युवा मोर्चामध्ये महाराष्ट्रात माझ्यासोबत उपाध्यक्ष म्हणून काम करणारी व्यक्ती ही देवेंद्र फडणवीस होती.

Smriti Irani memories with Fadnavis
Smriti Irani | जाती-धर्माच्या नावावर समाजाचे विभाजन करू देऊ नका!

इराणी पुढे म्हणाल्या की, 'तुम्ही विचार करा की त्यावेळी आम्ही २४ - २५ वर्षाची मुले तिथं बसून प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांना पाहत होतो. आज देखील ज्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीसजी भेटतो त्यावेळी आम्ही हसतो. आम्ही आयुष्यात कधीही विचार केला नव्हता की आम्ही इथं पर्यंत पोहचू.

इराणी यांनी एक छोटं उदाहरण देखील दिलं. मी २००४ मध्ये चांदणी चौकातून उभी होते. तिथं एक सज्जन आहेत जे आतही आमच्या संघटनेत काम करतात. चांदणी चौकातून प्रवीण खंडेलवाल खासदार आहेत. त्यावेळी प्रवीण खंडेलवाल आणि त्या सज्जन व्यक्तीचे तिकीट कापले गेले होते. ते तिकीट मला मिळाले होते. फॉर्म भरताना ते माझे डमी कँडिडेट बनले होते.

Smriti Irani memories with Fadnavis
Bill Gates – Smriti Irani | केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणींनी बिल गेट्‍स यांना दिले ‘फोडणी’चे धडे! ( व्‍हिडीओ )

खंडेलवालांचा चेहरा उतरला होता

खंडेलवाल यांचा चेहरा उतरला होता. ते अनेक वर्षापासून चांदणी चौकात रहात असून त्यांनी अनेक वर्षे संघटनेचं काम केलं होतं. मी त्यांना म्हणाले होते की पक्षाने मला असंच तिकीट दिलं. त्यावेळी व्यकय्या नायडूजी पक्षाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी आदेश दिला होता की तुम्हाला इथूनच लढायचं आहे विषय संपला. त्यावेळी मी प्रवीणजींची हात जोडून माफी मागितली होती. त्यावेळी मी म्हणाले होते की एक दिवस तुम्हाला नक्की तिकीट मिळेल आज ते खासदार आहेत.'

फडणवीसांचा गर्व वाटतो

स्मृती इराणी म्हणाल्या की, आज ज्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना पाहते त्यावेळी मला खूप गर्व होतो. आम्ही कुठं फिरत होतो. मी तर घराजून पेट्रोल मनी मागत होते. मला म्हणाचे की तुम्ही युवा मोर्चावाले सगळं घरातूनच घेऊन जाता.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news