पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडा सरकारने सोमवारी कॅनडात भारतीय उच्चायुक्तांना 'हिताची व्यक्ती' असे संबोधले होते. यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी कॅनडाला फटकारले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत सरकार कॅनडाने केलेले सर्व निराधात आरोप फेटाळत आहे. तसेच या आरोपांमागे कारण ट्रुडो सरकारचा राजकीय स्वार्थ असल्याचे मानते. हे आरोप राजकारणाने प्रेरित आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "रविवारी त्यांना एक मुत्सद्दी संदेश प्राप्त झाला आहे. यामध्ये म्हटले आहे की, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त आणि काही मुत्सद्दी एखाद्या प्रकरणाच्या तपासात 'हिताची व्यक्ती' आहेत, असे म्हटलं आहे. ट्रूडो सरकारकडून राजकीय फायद्यासाठी भारताची बदनामी केली जात आहे.
"कॅनडातील ट्रूडो सरकारनेभारतीय मुत्सद्दी आणि समुदायाच्या नेत्यांना धमकावणाऱ्या हिंसक कट्टरपंथी आणि दहशतवाद्यांना आपल्या देशात स्थान दिले आहे. ते मुत्सद्दीआणि भारतीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. या सर्व हालचाली अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्याय्य ठरवल्या जातील का, असा सवालही केला आहे.