Gujarat Bus Accident | गुजरातमध्ये स्लीपर बसची ट्रकला धडक; ६ ठार

बडोदा येथे पहाटेची दुर्घटना; ३१ प्रवासी जखमी, मृतांमध्ये ९ वर्षीय बालकाचा समावेश
Gujarat Bus Accident |
Gujarat Bus Accident | गुजरातमध्ये स्लीपर बसची ट्रकला धडक; ६ ठार
Published on
Updated on

बडोदा; वृत्तसंस्था : गुजरातमधील बडोदा येथे बुधवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ९ वर्षीय बालकाचाही समावेश आहे. बांसवाडा (राजस्थान) येथून सुरतकडे निघालेली खासगी स्लीपर बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात घडला.

ही दुर्घटना बडोद्यातील कोटांबी स्टेडियमजवळ घडली. प्राथमिक माहितीनुसार, बालाजी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस राजस्थानमधील बांसवाडा येथून सुरतकडे प्रवास करत होती. प्रवासादरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन धडकली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने सर सयाजीराव जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर ट्रकमधील माल रस्त्यावर विखुरला गेला.

त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक नियंत्रित करून वाहने पर्यायी मार्गांवर वळवली. अपघातग्रस्त बस आणि ट्रक हटवण्याचं काम सुरू आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणा अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news