Sleep Champion | रातोरात बनली कोट्यधीश; झोपेतच कमावले ९ लाख रुपये!

बंगळुरातील स्टार्टअप वेकफिटचा स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम
Sleep Champion
रातोरात बनली कोट्यधीश; झोपेतच कमावले ९ लाख रुपये!Pudhari
Published on
Updated on

बंगळुरू : 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी,' असे उगाच म्हणत नाहीत, याचा प्रत्यय बंगळुरूमधील एका महिलेला आला आहे. या महिलेला चक्क एका रात्रीत कोटीच्या घरात पैसे मिळाले आहेत. साईश्वरी असे या महिलेचे नाव आहे. बंगळुरातील स्टार्टअप वेकफिटचा स्लीप इंटर्नशिप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या इंटर्नशिप कार्यक्रमासाठी १० लाख लोकांनी नोंदणी केली आणि ५१ इंटर्न्सना रोजगारही मिळाला. (Sleep Champion)

या कार्यक्रमातील १२ 'स्लीप इंटर्न' पैकी साईश्वरी एक होती. यात साईश्वरीने 'स्लीप चॅम्पियन' हा किताब जिंकला. जे झोपेला प्राधान्य देतात, त्यांच्यासाठी हा इंटर्नशिप प्रोग्राम डिझाईन केला आहे. यामध्ये सहभागी स्पर्धकांनी दररोज रात्री किमान ८ ते ९ तासांची झोप घेणे आवश्यक असते. दिवसभरात २० मिनिटांची पॉवर नॅप्स घेण्यासाठीही गुण दिले गेले. या स्पर्धेत ही महिला विजेती ठरली आणि रातोरात विजेतीही ठरली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news