ब्यादगी शहराजवळ भीषण अपघातात कारचा चक्काचूर झाला. ANI X Account
राष्ट्रीय
Karnataka Accident | कर्नाटकातील ब्यादगी शहराजवळ भीषण अपघातात कारमधील ६ जणांचा मृत्यू ; २ जण जखमी
Byadgi Accident News | कार आणि ट्रक लॉरीचा अपघात
Car crash near Byadgi
हावेरी, कर्नाटक : हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग-४८ वरील कार आणि ट्रक लॉरीच्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले. ही घटना आज (दि.८) सकाळी घडली.
राष्ट्रीय महामार्ग-४८ वर हुबळीकडे जाणारे एक वाहन त्याच दिशेने जाणाऱ्या लॉरीशी धडकले आणि भीषण अपघात झाला. कारमधून ८ जण प्रवास करत होते. त्यापैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. २ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एसपी अंशु कुमार यांनी दिली.

